सांगलीत गुंडाच्या टोळीकडून दगडफेक; ग्रामस्थ एकत्र येताच सर्वांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:29 AM2019-01-22T00:29:45+5:302019-01-22T00:31:41+5:30

; वाल्मिकी आवासमध्ये भरदिवसा थरार; गुंड पवन साळुंखेसह चौदाजणांवर गुन्हा सांगली : जुना बुधगाव रस्त्यावर अत्यंत संवेदनशील भाग समजल्या ...

Ganges of Sangli gang gang rape; Once the villagers came together, they all came together | सांगलीत गुंडाच्या टोळीकडून दगडफेक; ग्रामस्थ एकत्र येताच सर्वांनी काढला पळ

सांगलीत गुंडाच्या टोळीकडून दगडफेक; ग्रामस्थ एकत्र येताच सर्वांनी काढला पळ

Next
ठळक मुद्देरहिवाशांना मारहाण : पाचजण जखमीरहिवाशांना मारहाण : पाचजण जखमी



; वाल्मिकी आवासमध्ये भरदिवसा थरार; गुंड पवन साळुंखेसह चौदाजणांवर गुन्हा
सांगली : जुना बुधगाव रस्त्यावर अत्यंत संवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या वाल्मिकी आवासमध्ये गुंड पवन साळुंखे टोळीने धुमाकूळ घालत रहिवाशांवर प्रचंड दगडफेक केली. पान दुकान चालकासह पाच जणांना टोळीने काठीने बेदम मारहाण केली. सोमवारी भरदिवसा ही थरारक घटना घडली. घटनेनंतर रहिवासी रस्त्यावर उतरल्यानंतर टोळीने पलायन केले.
गुंड पवन साळुंखे टोळीवर कारवाई करावी, या मागणीसाठी रहिवाशांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. रहिवाशांचा आक्रमकपणा पाहून पोलिसांनी पवन साळुंखे, समर्थ भारत पवार, रमजान आणि सुहेल (पूर्ण नाव निष्पन्न नाही) या चौघांविरुद्धच गुन्हा दाखल केला. त्यांच्या शोधासाठी एक पथकही रवाना केले. वाल्मिकी आवासमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या आश्रयास आहेत. दहशत माजवून रहिवाशांना ते दमदाटी करतात. अनेकदा येथे मारामारी व लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. एकाचा खूनही झाला आहे. गांजा ओढणे, मद्य प्राशन करण्यासाठी गुन्हेगारांनी येथे अड्डाच केला आहे. या गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाशांनी अनेकदा मागणी केली, पण शहर पोलिसांनी नेहमीच दुर्लक्ष केले.
सोमवारी दुपारी चार वाजता पवन साळुंखेसह चौघेजण वाल्मिकी आवासमध्ये आले. ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी तेथील पान दुकानदारास दमदाटी करुन दुकान बंद करण्यास सांगितले. त्याने ‘काय झालं’, अशी विचारणा केली. त्यानंतर चौघांनी पान दुकानदारास दगड व काठीने बेदम मारहाण केली. त्याने आरडाओरड केल्यानंतर काही रहिवासी तिथे आले. त्यांना पाहून या चौघांनी दगडफेक सुरु केली. दगड चुकवित रहिवासी तेथून पळून गेले. त्यानंतर पुन्हा पान दुकानदारास मारहाण केली. हा प्रकार पाहून संपूर्ण वाल्मिकी आवासमधील रहिवासी रस्त्यावर उतरले. सर्व रहिवासी चाल करुन येत असल्याचे लक्षात येताच चौघांनी तेथून पळ काढला. दगडफेकीत पान दुकानदारासह पाचजण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दाखल झाले. रहिवाशांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. पवन साळुंखेविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. साळुंखेसह चौघांना अटक केल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस ठाण्यासमोरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलीस अधिकाºयांनी शोधासाठी पथक रवाना केले असल्याचे सांगितले.

पवन साळुंखे रेकॉॅर्डवरील गुन्हेगार
गुंड पवन साळुंखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. अनेकदा त्याला पोलिसांनी अटक केली. पण तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच राहिल्या आहेत. वाल्मिकी आवासमध्ये तो नेहमीच येऊन दादागिरी करीत असे. त्याच्या दहशतीला रहिवासी घाबरत होते. सोमवारी तो रहिवाशांच्या तावडीत सापडला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गुंड पवन साळुंखे याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी वाल्मिकी आवासमधील रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
 

Web Title: Ganges of Sangli gang gang rape; Once the villagers came together, they all came together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.