कचरा ही आपत्ती नव्हे, संपत्ती! संजय कांबळे : महापालिकेच्या व्याख्यानमालेची सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:58 PM2018-05-23T23:58:57+5:302018-05-23T23:58:57+5:30
कचरा निर्मूलनाकडे सेवाभावी संस्थांनी संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, असे मत लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वि. स. खांडेकर
सांगली : कचरा निर्मूलनाकडे सेवाभावी संस्थांनी संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, असे मत लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयाच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना कांबळे बोलत होते.
शाळा नं. १ मध्ये वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते यांनी दीपप्रज्ज्वलन करुन केले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, सहाय्यक आयुक्त एस. एस. खरात, गौतम भिसे, संभाजी मेथे, सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते आदी उपस्थित होते.
सुरुवातीला सभापती बसवेश्वर सातपुते यांनी वक्ते संजय कांबळे यांचे पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. यावेळी लातूर शहरात कचरा वेचक काम करणाऱ्या महिलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी आपल्या कार्याची ओळख प्रात्यक्षिकासह सादर केली.
ते म्हणाले, लातूर शहरात आम्ही कचरा वेचक म्हणून काम करणाºया महिलांची ‘जनसेवा घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्था’ नावाची संस्था स्थापन केली व लोकसहभागातून कचरा निर्मूलन केले. स्वच्छतेसाठी सेवाशुल्क गोळा केले. काच, कागद, प्लॅस्टिक अशा कचºयातून उत्पन्न निर्माण करुन दिले. महिन्याला ८० लाखाच्या वर उलाढाल कचºयातून होऊ शकते. श्री. कांबळे यांनी, कचरा वेचक म्हणून काम करणाºया महिलांसाठी काम करताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करीत स्थापन केलेली संस्था, त्यातून कचरा वेचणाºया महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात आलेले यश... अशी यशोगाथा चलचित्राद्वारे मांडली.
सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा
कांबळे म्हणाले, कचरा ही आपत्ती नव्हे, तर संपत्ती आहे. नियोजन केल्यास उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन, संस्था स्थापन करुन कचºयापासून महिलांना नवा रोजगार निर्माण करून देण्याची गरज आहे. कचरा हे सोने आहे, ते हाताळता आले पाहिजे.
महापालिकेच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे उद््घाटन स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्याहस्ते झाले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, दिलीप पाटील, एस. व्ही. पाटील, संजय कांबळे उपस्थित होते.