बागणीत विलगीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:40+5:302021-06-01T04:20:40+5:30
बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे राजारामबापू साखर कारखाना व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विलगीकरण केंद्राचा प्रारंभ राष्ट्रवादीचे जिल्हा ...
बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे राजारामबापू साखर कारखाना व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विलगीकरण केंद्राचा प्रारंभ राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
बागणी येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठकीवेळी बागणीमध्ये विलगीकरण व कोरोना सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन, ऑक्सिमीटर, स्कॅनर आणि विलगीकरणासाठी ३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी कचरे, बागणीचे सरपंच संतोष घनवट, प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नाजमीन शिकलगार, राजारामबापू कारखान्याचे संचालक एल. बी. माळी, मार्केट कमिटीचे सभापती अल्लाउद्दीन चौगले, उपसरपंच विष्णू किरतसिंग, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब कारंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डी. आर. पाटील, राजेंद्र पवार, सुभाष हवलदार, सतीश काईत, दिनकर पाटील, शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष अल्लाउद्दीन यु. चौगले उपस्थित होते.
फोटो ओळ :
बागणीत विलगीकरण केंद्राचा प्रारंभ करताना बाळासाहेब पाटील, विजय पाटील, संभाजी कचरे, बागणीचे सरपंच संतोष घनवट.