तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेती धोक्यात : अपुऱ्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:08 AM2018-11-11T00:08:27+5:302018-11-11T00:09:23+5:30

द्राक्षपंढरी म्हणून जगभर ओळख असणाºया तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Garg farming threats in Tasgaon taluka: Inadequate rain | तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेती धोक्यात : अपुऱ्या पावसाचा फटका

तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेती धोक्यात : अपुऱ्या पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देबागायतदारांची आर्थिक कोंडी; बागेवर कुºहाड चालविण्याची अनेकांवर वेळ

मांजर्डे : द्राक्षपंढरी म्हणून जगभर ओळख असणाºया तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अपुºया पावसाने सर्वच ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असून गावागावात या संकटाला तोंड देत बागायतदार आता विकास सोसायटी व बँकांचे कर्ज काढून नव्या द्राक्ष बागा उभा करीत आहे.

मान्सून पावसाने तालुक्यात ओढ दिल्याने खरीप हंगामासह द्राक्ष शेतीला काडी बनवण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. टंचाईच्या काळात शेतकºयांनी आपल्या बागा जेमतेम पाण्यावर प्रसंगी टँकरने पाणी घालून फळछाटणी पर्यंतचा प्रवास केला. पूर्व व पश्चिम भागातील द्राक्षबागा एप्रिल, मे दरम्यान झालेल्या गारपिटीच्या शिकार झाल्या. प्रसंगावधान ओळखून काही बागायतदारांनी दुबार छाटणी घेतली व माल काडी तयार केली. परंतु पूर्ण दिवस न भरल्याने व तापमान कमी-अधिक प्रमाणात मिळाल्याने गारपीटमध्ये सापडलेल्या सर्वच द्राक्षबागा पूर्ण फेल गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे.

मान्सून पावसाने दिलेली ओढ आणि भागातील अपुरा पाणीसाठा तसेच उन्हाळ्यात द्राक्षात साखर भरणीच्या काळातील भेडसावणारी पाणी टंचाई यामुळे सर्वच बागायतदारांनी आपले द्राक्ष बागेचे छाटणीचे वेळापत्रक बदलून उशिरा छाटण्या घेतल्या. पाणीप्रश्न डोळ्यासमोर असतानाच बागा छाटणीचा श्रीगणेशा मजुरांचा अपुरा पुरवठा व मजुरी दरवाढीने झाला. आॅक्टोबर छाटणी झालेल्या बागा पोंगा अवस्थेत असताना पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील सुपर सोनाक्का आणि माणिक चमन जातीच्या बागांचे हजारो एकर क्षेत्र फेल गेल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल, मे मधील गारपीट कारणाने हजारो एकर द्राक्ष क्षेत्राचे नुकसान झाले.

येळावी परिसरातील एप्रिलमध्ये पडलेल्या गारांचा काडीला मार लागून जखमा झाल्या. काही बागायतदारांनी दुबार छाटणी करून माल काडी तयार करूनही द्राक्ष बागांना माल न आल्याने काही शेतकºयावर आपल्या बागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली आहे.

शेतकºयांना मदत : देण्याची मागणी
द्राक्ष शेतीमधील अवकाळी पाऊस व पाणी टंचाई यासाठी छाटणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन वाणाची द्राक्षे लागवडीसाठी बदलत्या हवामानात किमान तीन वर्षे वाढलेल्या जातीची निवड करावी लागते. गारपीटमुळे माल न आल्याने द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी तसेच कर्जमाफी मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

रोगाने काढले डोके वर
भागातील जवळपास सर्वच बागा फुलोरावस्था चालू असताना कमी-जास्त प्रमाणात जिल्ह्यात सर्वच भागात पाऊस पडला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पावसाने हजेरी लावलेल्या बागेत डाऊनी रोगाने जोमाने डोके वर काढले आहे. पानासह घडावर डाऊनी दिसू लागला आहे. द्राक्ष बगायतदारांची ऐन दिवाळीत कोंडी झाली आहे.

Web Title: Garg farming threats in Tasgaon taluka: Inadequate rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.