गॅस वितरकाकडून ग्रामस्थांना दमदाटी

By admin | Published: July 14, 2014 12:19 AM2014-07-14T00:19:29+5:302014-07-14T00:36:18+5:30

येळावीतील प्रकार

Gas Distribution | गॅस वितरकाकडून ग्रामस्थांना दमदाटी

गॅस वितरकाकडून ग्रामस्थांना दमदाटी

Next

येळावी : पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील भारत गॅस वितरणच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येळावीसह परिसरातील नागरिकांना गॅस पुरवठाही अनियमित केला जात असून, गॅसधारकांना उद्धट उत्तरे दिली जात आहेत.
किर्लोस्करवाडी येथील कुलकर्णी बंधू हे तालुक्यातील एकमेव वितरक आहेत. येळावी, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस, मोराळे, आंधळी, कुंडल व परिसरामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. नागरिकांना वेळेवर सिलिंडर पुरवठा केला जात नाही. ग्राहकांची नेहमीच बोळवण केली जात आहे. याबाबत विचारणा केल्यास कुलकर्णी बंधूंकडून दमदाटी करण्याचे प्रकार रोज सुरू आहेत. याबाबत तहसीलदार कार्यालयातून योग्य न्याय मिळत नसल्याची येथील ग्राहकांची तक्रार आहे. याबाबत या गॅस वितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, तुम्ही ज्या गावचे आहात, त्याच गावात आमची गाडी आल्यानंतर सिलिंडर उपलब्ध होईल अन्यथा आमच्या कार्यालय वा इतर ठिकाणी तुम्हाला पुरवठा केला जाणार नाही, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)
बेसुमार वाळू उपशाने जॅकवेलला धोका
अंकलखोपमधील प्रकार : ग्रामस्थांची तक्रार
अंकलखोप : अंकलखोप (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा जॅकवेलसमोरच वाळू उपसा सुरू असल्याने जॅकवेलला धोका निर्माण झाला आहे. तसेच बोटीच्या इंजिनचे डिझेल पाण्यावर पसरून पाणी दूषित होत आहे. हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी सरपंच सौ. श्वेता बिरनाळे, उपसरपंच सतीश सूर्यवंशी व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन पलूस तहसीलदार, जिल्हाधिकारी, पलूस पोलीस ठाणे यांना देऊन सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचा इशाराही दिला आहे.
भिलवडीच्या बाजूला ठेका असतानाही दोन बोटीद्वारे अंकलखोपच्या बाजूलाही वाळू उपसा केला जातो. अंकलखोप व परिसरातला दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार होण्याचा धोका आहे. जॅकवेलपासून केवळ २०० ते २५० फुटावर बोटीद्वारे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Gas Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.