आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीकर गौतमीपुत्र कांबळे

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 22, 2023 03:16 PM2023-02-22T15:16:30+5:302023-02-22T15:17:15+5:30

कुळगाव, बदलापूर नगरपरिषद हॉल, कात्रप चौक येथे होणाऱ्या संमेलनाचे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उद्घाटक आहेत

Gautamiputra Kamble as President of Ambedkari Sahitya Sammelan | आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीकर गौतमीपुत्र कांबळे

आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीकर गौतमीपुत्र कांबळे

googlenewsNext

सांगली : बदलापूर येथे होणाऱ्या आठव्या आंबेडकरी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक गौतमीपुत्र कांबळे (सांगली) यांची निवड झाली आहे. 25 आणि 26 फेब्रुवारीला संमेलन होत आहे. 

कुळगाव, बदलापूर नगरपरिषद हॉल, कात्रप चौक येथे होणाऱ्या संमेलनाचे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उद्घाटक आहेत, तर ज्येष्ठ साहित्यिक बी.अनिल तथा अनिल भालेराव स्वागताध्यक्ष आहेत. दोन दिवस होणाऱ्या संमेलनात विविध विषयांवर चर्चा आणि परिसंवाद होणार आहेत. भारतीय संविधान : एक चिकित्सक अभ्यास, आंबेडकरी स्व-कथने : वास्तव आणि विपर्यास अशा महत्वाच्या विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, नाटकाचे सादरीकरण आणि निमंतत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. रविवार, 26 फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Gautamiputra Kamble as President of Ambedkari Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.