कर्नाटक- महाराष्ट्रातील बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:09 PM2020-03-20T21:09:16+5:302020-03-20T21:13:05+5:30

दोन्ही राज्यातील प्रवासी वाहतूक थांबल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक प्रवासी मिरज आणि सांगली आगारात थांबून होते. एसटी प्रशासनाने कर्नाटकच्या सर्व बसेस बंद झाल्याचे सांगितल्यानंतर, ते प्रवासी घराकडे परत गेले.

General Chat Chat Lounge There are 19 buses from Karnataka and 4 buses in Maharashtra | कर्नाटक- महाराष्ट्रातील बससेवा बंद

कर्नाटक- महाराष्ट्रातील बससेवा बंद

Next
ठळक मुद्दे मिरज, सांगली, जत, कवठेमहांकाळ आगाराच्या रोज ४३ फेऱ्या रद्द

सांगली : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सर्व बस फे-या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही मिरज, सांगली, जत, कवठेमहांकाळ आगारातून रोज कर्नाटकात जाणा-या ४३ बसेसच्या फे-या रद्द केल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सांगलीच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.
कर्नाटक सरकारच्या बसेसच्या सांगली जिल्'ात रोज ९० फे-या होत होत्या. मिरज, सांगली, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक फे-या सुरू होत्या.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरातच वाढत आहे. हा धोका टाळण्यासाठी सर्वच राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार कर्नाटक सरकारने त्यांच्या महाराष्ट्रात जाणाºया सर्व बसेस शुक्रवार दि. २० मार्चपासून बंद केल्या आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातून येणाºया सर्व बसेसनाही त्यांनी बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक फटका सांगली जिल्'ातील प्रवाशांना बसणार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात रोज हजारो प्रवासी ये-जा करीत आहेत. कर्नाटकच्या ९० बसेस आणि महाराष्ट्रातील ४३ बसेसच्या रोज फे-या होत होत्या. दोन्ही राज्यातील प्रवासी वाहतूक थांबल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक प्रवासी मिरज आणि सांगली आगारात थांबून होते. एसटी प्रशासनाने कर्नाटकच्या सर्व बसेस बंद झाल्याचे सांगितल्यानंतर, ते प्रवासी घराकडे परत गेले.

 

Web Title: General Chat Chat Lounge There are 19 buses from Karnataka and 4 buses in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.