‘सृजन शिक्षण’ ग्रुपने दिला शिक्षक-विद्यार्थ्यांमधील लेखकाला जन्म : - शिक्षकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:16 AM2019-01-01T01:16:04+5:302019-01-01T01:17:42+5:30

शरद जाधव। सांगली : वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. या शाळांतील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक ...

'Generation education' group gives birth to a teacher-student writer: - Teacher participation | ‘सृजन शिक्षण’ ग्रुपने दिला शिक्षक-विद्यार्थ्यांमधील लेखकाला जन्म : - शिक्षकांचा सहभाग

‘सृजन शिक्षण’ ग्रुपने दिला शिक्षक-विद्यार्थ्यांमधील लेखकाला जन्म : - शिक्षकांचा सहभाग

Next
ठळक मुद्दे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी होतोय प्रयत्नउपक्रमातून घडलेल्या एका विद्यार्थ्याचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

शरद जाधव।
सांगली : वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. या शाळांतील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक खासगी शाळांनाही आव्हान देतील असे विद्यार्थी तयार केले आहेत. अशाच उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत, त्यांना प्रेरणा देण्यासाठी सृजन शिक्षण ग्रुप कार्यरत आहे.

शिक्षकांमध्येही गुणवत्ता असते, मात्र त्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील जग दिसतच नाही, असा एक सूर असतो. सध्या शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल आणि नवी आव्हाने आपल्या शिक्षकांना कळावीत, यासाठी असा एखादा ग्रुप असावा, हा विचार साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी नामदेव माळी यांच्या मनात आला. त्यांनी आपला विचार उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांना बोलून दाखविला आणि त्याक्षणीच ‘सृजन शिक्षण’चे काम सुरू झाले. मिरज तालुक्यातील प्राथमिक शाळेतील आठ उपक्रमशील शिक्षकांचा यात सहभाग आहे. याच शिक्षकांनी एकत्र येत लिहिलेले ‘आठ शिक्षकांची आत्मवृत्ते’ पुस्तक प्रसिध्द झाले आहे. या प्रेरणेतून शिक्षक तर लिहिते झालेच, शिवाय विद्यार्थ्यांनाही लिखाणाची सवय लावली आहे. त्यातूनच गौतम पाटील या विद्यार्थ्याच्या काव्यलेखनाला राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

या ग्रुपमध्ये नामदेव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात पाटोळे, विकास देवके, विजय भिसे, विश्वास आठवले, सचिन पाटील, राजाराम केंगार, राजेंद्र राऊत, भीमराव कांबळे, श्रध्दा कुलकर्णी आदी उपक्रमशील शिक्षक कार्यरत आहेत. लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट, माजी महापौर सुरेश पाटील यांच्या सहकार्यातून शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. २०१५ मध्ये पहिल्या राज्यव्यापी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यात शैक्षणिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठीही ‘सृजन शिक्षण’ने कार्यशाळा घेतली.

शिक्षण परिषद म्हणजे केवळ व्याख्यानेच न ठेवता, प्रत्येक शिक्षण परिषदेला एक ‘थीम’ असते. त्यानुसार पहिल्या परिषदेसाठी ‘ज्ञानरचनावाद’, तर त्यानंतरच्या परिषदेत ‘गुणवत्तावाढ’, ‘नवोपक्रम’ विषय घेऊन राज्यातील शिक्षणतज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले होते.

केल्याने होत आहे रे...
‘सृजन शिक्षण’मधील सर्व सदस्य हे प्राथमिक शिक्षक आहेत. भविष्यातील सुदृढ समाज निर्मिती शिक्षकांच्या हाती असते, हेच ओळखून आपला सहकारी आव्हानांना सामोरे जाण्यास तयार व्हावा व त्याला नवीन बदल सहजपणे आत्मसात व्हावेत यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तेथील गुणवत्तेविषयी अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी, ‘सृजन शिक्षण’च्या सदस्यांनी ‘केल्याने होत आहे रे...’ची साद दिली आहे.

सृजन शिक्षणतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रत्येक उपक्रमानंतर मान्यवरांसोबत सृजन शिक्षणचे सदस्य मनमोकळेपणाने एकत्र येतात.

Web Title: 'Generation education' group gives birth to a teacher-student writer: - Teacher participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.