गरज असेल तरच घराबाहेर पडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:09+5:302021-05-26T04:27:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा शहरातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
आष्टा नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रास पाटील यांनी भेट दिली. आढावा बैठक घेतली.
पाटील यांनी शहरातील कोरोना रुग्णांसंदर्भात मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडून सर्व माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी लसीकरणाबाबतीत तक्रारी मांडल्या. आष्टा शहरात नगरपालिकेस रुग्णालय मंजूर करण्यात यावे, नवीन रुग्णवाहिका आणि शववाहिका देण्याची मागणी केली.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, दीक्षांत देशपांडे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, अमोल डफळे, बाळासाहेब पाटील, स्नेहा माळी, विराज शिंदे, माणिक शेळके, रघुनाथ जाधव, उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे उपस्थित होते.