घनश्याम केळकरांचे चार हजार किलोमीटरचे पायी भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:45+5:302020-12-27T04:19:45+5:30

केळकर म्हणाले, ‘अकस्मात आजारपणामुळे उद्भवणारे खर्च आणि त्यामुळे दारिद्र्याच्या खाईत लोटली जाणारी कुटुंबे, त्या कुटुंबांतील व्यक्तींना रुग्ण सांभाळणे आणि ...

Ghanshyam Kelkar's 4,000 km trek | घनश्याम केळकरांचे चार हजार किलोमीटरचे पायी भ्रमण

घनश्याम केळकरांचे चार हजार किलोमीटरचे पायी भ्रमण

googlenewsNext

केळकर म्हणाले, ‘अकस्मात आजारपणामुळे उद्भवणारे खर्च आणि त्यामुळे दारिद्र्याच्या खाईत लोटली जाणारी कुटुंबे, त्या कुटुंबांतील व्यक्तींना रुग्ण सांभाळणे आणि उपचारासाठी खर्चाची तरतूद करणे या अवघड कसरती कराव्या लागतात. समाजात अशा लोकांना मदत करू इच्छिणाऱ्या दानशूरांची संख्याही मोठी आहे. गरजू आणि दानशूर यांची गाठ घालून गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी १०० कोटींचा सामाजिक आरोग्य विमा उभा करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून सक्रिय योगदान देण्याकरिता वेबसाईट सुरू केली आहे. ३४४ दिवसांच्या या पदभ्रमण मोहिमेचा टप्पा चार हजार किलोमीटरचा असून ही मोहीम सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर जिल्ह्यांचा प्रवास करून १२ ऑक्टोबर रोजी या मोहिमेची सांगता छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणार आहे. सांगली येथे विविध मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू असून स्वयंसेवक व दाते यांचा संच उभा करण्याचा मानस केळकर यांनी बोलून दाखविला.

Web Title: Ghanshyam Kelkar's 4,000 km trek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.