सांगलीची हळद म्हणूनच जीआय मानांकन द्या : इंडियन पेटंट कार्यालयाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 08:30 PM2018-06-12T20:30:37+5:302018-06-12T20:30:37+5:30
भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे
सांगली : भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे सांगलीची हळद म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जी.आय.) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली आहे. यावर दि. २६ जून रोजी सुनावणी होणार आहे.
वर्धा जिल्'ातील वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिन तेलाचे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने आता इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले आहे. तेथील वैशिष्ट्यांवर ते मिळाले आहे. त्याला सांगलीच्या शेतकºयांचा विरोध नाही. तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांना ते मिळाले आहे. मात्र सांगलीच्या हळदीत वायगाव हळदीपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असल्यामुळे ‘सांगलीची हळद’ म्हणूनच मानांकन मिळाले पाहिजे, अशी जिल्'ातील शेतकºयांची मागणी आहे. पुण्यातील ‘जीआय' विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी काही शेतकºयांच्यावतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सांगलीच्या मागणीवर मुंबई येथील इंडियन पेटंट कार्यालयात दि. २६ जूनरोजी सुनावणी होणार आहे.
प्रा. हिंगमिरे म्हणाले की, सांगली ही देशातीलच नव्हे, तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा हळद वायदेबाजार, बँकांकडून हळदीचे पॉलिश आणि पावडर यांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य, त्या परिसरात उभारलेल्या हळद पावडर आणि पॉलिश मिल्स-वेअरहाऊस-गोदामे, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था आदी घटक, सांगली हे देशभरातले हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले. कोरडे व उष्ण हवामानामुळे हळदीचा नैसर्गिक रंग केशरी, चव थोडीशी कडवट, तिखट आहे.
या वैशिष्ट्यांवरच सांगलीची हळद म्हणूनच जीआय मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत. दि. २६ जून रोजी मुंबई येथील इंडियन पेटंट कार्यालयात सुनावणी होणार असून, निश्चित मानांकन मिळणार, असा आम्हाला विश्वास आहे. वायगाव हळदीला जीआय तेथील वैशिष्ट्यांवर मिळाले आहे. त्यामुळे सांगलीच्या हळदीला मानांकन मिळण्यात अडचण नाही, असाही विश्वास हिंगमिरे यांनी व्यक्त केला.