जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळस व कढीपत्ता रोपे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:12+5:302021-06-06T04:20:12+5:30
आष्टा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आष्टा येथील शिव सम्राट फाउंडेशनच्या वतीने शिराळकर कॉलनीतील नागरिकांना तुळस व कडीपत्त्याचे रोप ...
आष्टा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आष्टा येथील शिव सम्राट फाउंडेशनच्या वतीने शिराळकर कॉलनीतील नागरिकांना तुळस व कडीपत्त्याचे रोप भेट देण्यात आले.
अध्यक्ष महेश गायकवाड म्हणाले, कोरोनाचे संकट वाढत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. घरोघरी वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे.
यावेळी श्रीराम ढोले, देवचंद्र आवटी, अनिकेत ढोले, चेतन मोहिते, सुदीप हालुंडे, बाहुबली हालुंडे, मानसिंग वीरभक्त, दीपक गायकवाड, डॉ. संदीप देसाई, सुरेश कोळी, संतोष गावडे व दिलीप पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो : ०५ आष्टा ३
ओळ : आष्टा येथील शिव सम्राट फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त महेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी शिराळकर कॉलनीतील नागरिकांना तुळस व कडीपत्ता रोपे भेट दिली.