सांगलीत कॅफेमध्ये युवतीवर अत्याचार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली कॅफेची तोडफोड

By घनशाम नवाथे | Published: May 17, 2024 12:54 PM2024-05-17T12:54:15+5:302024-05-17T12:54:40+5:30

पोलिसांच्या हप्तेखोरीने कॅफेत लैंगिक चाळ्यांना ऊत आल्याचा आरोप

Girl assaulted cafe in Sangli, Angry activists of Shiv Pratisthan Yuva Hindustan vandalized the cafe | सांगलीत कॅफेमध्ये युवतीवर अत्याचार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली कॅफेची तोडफोड

सांगलीत कॅफेमध्ये युवतीवर अत्याचार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली कॅफेची तोडफोड

सांगली : सांगलीतील कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शंभरफुटी रस्त्यावरील हॅंग आॅफ कॅफेवर हल्लाबोल केला. आतील सर्व केबिनची व साहित्याची तोडफोड केली. बाहेरील फलकही दगडफेक करुन फोडला.

अधिक माहिती अशी, शंभरफुटी रस्त्यावरील हँग ऑफ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन युवतीशी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण (वय २५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) याच्याविरुद्ध बलात्कार आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यानशिवप्रतिष्ठानयुवा हिंदुस्थान संघटनेने दोन वर्षापूर्वी सांगलीतील कॅफेमध्ये लैंगिक चाळे सुरु असल्याची तक्रार करत सर्व कॅफे बंद करण्याचा इशारा दिला होता. थोडे दिवस प्रकार शांत राहिला. त्यानंतर राजरोसपणे कॅफेमध्ये लैंगिक चाळे करण्यासाठी मूभा दिली जात आहे. सहा महिन्यात याबाबत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हॅंग आॅफ कॅफेवर हल्लाबोल केला. 

कॅफेतील केबिनची तोडफोड केली. आतील फर्निचर, खुर्च्यांची तोडफोड केली. फलकावरदगडफेक करुन तो फाडला. जोरदार घोषणाबाजी केली. विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळघटनास्थळी धाव घेतली.

संघटनेचे रणजीत चव्हाण म्हणाले, सांगलीतील अनेक कॅफे मिनी लाॅज बनले आहेत येथे लैंगिक चाळ्यासाठी केबिन दिल्या जातात. हे कॅफे बंद करण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. परंतू पोलिस हप्ते घेऊन कारवाई करत नाहीत. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरु राहिल्यास तोडफोड करावी लागेल.

दिगंबर साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे शेकडो कॅफे सुरु आहेत. तेथे आम्हाला आंदोलन करावे लागेल. सांगलीतील या प्रकरणात कॅफे मालकावर गुन्हा दाखल करुन सहआरोपी करावे.

Web Title: Girl assaulted cafe in Sangli, Angry activists of Shiv Pratisthan Yuva Hindustan vandalized the cafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.