मुलींचे नातेवाईक सांगलीत
By admin | Published: July 15, 2016 11:18 PM2016-07-15T23:18:07+5:302016-07-16T00:03:11+5:30
वैद्यकीय तपासणी : दलाल महिलेसह दोघींना कोठडी
सांगली : बेळगाव येथून सांगलीत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन अल्पवयीन पीडित मुलींचे नातेवाईक शुक्रवारी सांगलीत आले. न्यायालयाच्या आदेशाने येत्या एक-दोन दिवसात त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या दलाल झिनत जमादार व यास्मिन नायकवाडी यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित झिनत व यास्मिन या दोघींनी १७, १५ व १२ वर्षाच्या बेळगाव येथील तीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी सांगलीत आणले होते. पण मुलींना याची भनकही लागली आहे. इंडियन रेस्क्यू मिशन या संघटनेच्या मदतीने पोलिसांनी या दोघींना पकडून पीडित मुलींची सुटका केली होती. प्रत्येक मुलीचा २० हजारप्रमाणे त्यांनी सौदा ठरविला होता.
या कारवाईची माहिती मिळताच मुलींचे नातेवाईक शुक्रवारी सांगलीत आले. त्यांनी पोलिसांची भेट घेऊन सर्व माहिती घेतली आहे. पोलिसही नातेवाईकांकडे या मुली येथे कशा आल्या, याबद्दल चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)
लग्नाला चला!
संशयित झिनत व यास्मिन या दोघींनी या मुलींना लग्नाला तसेच मिरजेत दर्ग्याला जायचे आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून सांगलीत आणल्याचे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये आणखी को'णाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरु असल्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले.