शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या-: मिरजेत म्हैसाळ रस्ता, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:00 AM2019-02-26T00:00:25+5:302019-02-26T00:01:57+5:30

साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज

Give five thousand pensions to farmers-: Mirejet Mhasal road, stop the route at Bhivghat in Khanapur taluka | शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या-: मिरजेत म्हैसाळ रस्ता, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे रास्ता रोको

शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या-: मिरजेत म्हैसाळ रस्ता, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे रास्ता रोको

Next
ठळक मुद्दे जनता दलाचे आंदोलन

मिरज/विटा : साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज-म्हैसाळ मार्गावरील उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. एक तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

राज्य जनता दलाने साठ वर्षावरील वयोवृध्द शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन करावी व निराधार लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये भरीव वाढ करावी या मागणीसाठी गेली दहा वर्षे राज्यव्यापी आंदोलन, मोर्चे, संघर्ष यात्रा, रास्ता रोको अशा अनेक मार्गाने आंदोलन केली. मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा व पंजाब सरकारने वयोवृध्द शेतकºयांना पेन्शन लागू केली आहे. मात्र राज्य शासनाने आश्वासनाशिवाय शेतकºयांना काहीच दिले नाही. राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजना फसव्या आहेत.

जनता दलाने केलेल्या मागण्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी राज्य जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. फैयाज झारी, जिनगोंडा पाटील, युसूफ मुल्ला, संजय ऐनापुरे, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील, समाजवादी पार्टीचे सुलेमान आलासे, एम. के. माळी यांनी आंदोलन केले. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शेतकºयांच्या व निराधार लाभार्थ्यांच्या मागण्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. आंदोलनामुळे मिरज-म्हैसाळ मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प होती. आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी होते.

दरम्यान, देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्टÑ शासनानेही ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी जनता दलाच्यावतीने भिवघाट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शरद पाटील यांनी केले. यावेळी आंदोलकांनी चारही मार्ग रोखून धरल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली.
देशातील १२ राज्यांत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली होती. परंतु, शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ज्येष्ठांवर अन्याय केला असल्याचे माजी आ. शरद पाटील यांनी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात आबासाहेब सागर, प्रा. लक्ष्मण शिंदे, जगन्नाथ माने, बाबासाहेब पाटील, भानुदास सूर्यवंशी, रघुनाथ रास्ते, गोपीनाथ सूर्यवंशी, बापूलाल मुलाणी, आर. व्ही. पाटील, दिलीप गायकवाड, वसंत मंडले, पोपट खराडे, समाधान पाटील, शैलजा भिंगारदेवे, राधिका जगताप, विजय चव्हाण, काकासाहेब शिंदे, प्रतिभा चव्हाण, सुनील लोंढे, डॉ. रमा घाडगे, महादेव गुरव यांच्यासह खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विटा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.


आंदोलकांमुळे पोलिसांची तारांबळ
भिवघाट येथे संतप्त आंदोलकांनी पंढरपूर-नागज महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक दोन तासासाठी ठप्प झाली. वाहनांची लांबच्या लांब रांग लागली होती. आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर, साने गुरूजी यांच्या ‘आता उठवू सारे रान...’ या गीताने रास्ता रोको आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Web Title: Give five thousand pensions to farmers-: Mirejet Mhasal road, stop the route at Bhivghat in Khanapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.