प्राधान्य कुटुंब योजनेत नसलेल्या गरजूंना धान्य द्या : महादेव हाेवाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:53+5:302021-04-20T04:28:53+5:30

प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश नसलेल्या सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबाला मोफत धान्य मिळावे, अशी मागणी महादेव होवाळ यांनी केली आहे. कडेगावच्या ...

Give food to the needy who are not in the priority family plan: Mahadev Haewal | प्राधान्य कुटुंब योजनेत नसलेल्या गरजूंना धान्य द्या : महादेव हाेवाळ

प्राधान्य कुटुंब योजनेत नसलेल्या गरजूंना धान्य द्या : महादेव हाेवाळ

Next

प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश नसलेल्या सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबाला मोफत धान्य मिळावे, अशी मागणी महादेव होवाळ यांनी केली आहे.

कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील

यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी वंचित व गोरगरीब कुटुंबातील लोकांना मोफत धान्य द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की,

राज्य सरकारने कोरोनामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे मागासवर्गीय, सर्वसामान्य, गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असलेल्या कुटुंबाचा कामधंदा बंद झाला आहे. या काळात शासन रेशनकार्डवर प्राधान्य कुटुंब योजनेतील लोकांना मोफत धान्य देणार आहे; परंतु योजनेबाहेरील गोरगरीब लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, सांगली जिल्ह्यातील याही लोकांना मोफत धान्य मिळावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी आरपीआय (ए) चे पदाधिकारी

व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Give food to the needy who are not in the priority family plan: Mahadev Haewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.