मुलींना तातडीने मोफत एसटी पास द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:15+5:302021-01-08T05:26:15+5:30
इस्लामपूर : शहरातील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना तातडीने मोफत एसटी पास मिळावा. तसेच ...
इस्लामपूर : शहरातील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना तातडीने मोफत एसटी पास मिळावा. तसेच बऱ्याच एसटी वेळेवर येत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी वेळेवर सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवती व विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
इस्लामपूर आगार प्रमुख शर्मिष्ठा घोलप, व्यवस्थापक सुनंदा देसाई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घोलप यांनी या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही दिली.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष जुबेर खाटीक, युवती संघटनेच्या शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे, सुप्रिया पेठकर, मनाली वडार, ऋतुजा देसाई, आदिती जाधव, प्रतीक्षा देसाई, विद्यार्थी संघटना व युवती संघटनेचे पदाधिकारी, के. आर. पीण कॉलेजमधील पदाधिकारी उपस्थित होतेण
फोटो ओळी- ०४०१२०२१ -आयएसएलएम-इस्लामपूर निवेदन न्यूज
ओळी- इस्लामपूर येथे सुनंदा देसाई यांना विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष जुबेर खाटीक, युवतीच्या शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनी निवेदन दिले. यावेळी सुप्रिया पेठकर, मनाली वडार, ऋतुजा देसाई, आदिती जाधव उपस्थित होत्या.