साखरेप्रमाणेच दुधालाही अनुदान द्या-सदाभाऊ खोत : राज्य-केंद्रकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:32 PM2018-06-15T20:32:31+5:302018-06-15T20:38:01+5:30

अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला आहे. याच धर्तीवर सध्या दुधाच्याबाबतीतही शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी दूध व्यवसायालाही विशेष पॅकेज देऊन अडचणीतून बाहेर

Give milk to sugar as per sugar - Sadabhau Khot: The demand for the state-center | साखरेप्रमाणेच दुधालाही अनुदान द्या-सदाभाऊ खोत : राज्य-केंद्रकडे मागणी

साखरेप्रमाणेच दुधालाही अनुदान द्या-सदाभाऊ खोत : राज्य-केंद्रकडे मागणी

Next

सांगली : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला आहे. याच धर्तीवर सध्या दुधाच्याबाबतीतही शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी दूध व्यवसायालाही विशेष पॅकेज देऊन अडचणीतून बाहेर काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, रासायनिक खते, औषधांच्या बेसुमार वापरामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन, सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. खोत म्हणाले की, सध्या कमी दूध संकलनाचा काळ असतानाही राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. जागतिक बाजारात दूध पावडरीचे भाव कोसळल्यानेच ही अडचण आली आहे. २३० ते २४० रूपयांवर असलेला दर आता १३० ते १४० रूपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.

दूध व्यवसायावरील अडचणी दूर करावयाच्या झाल्यास, साखरेप्रमाणेच दुधासाठीही विशेष पॅकेजची गरज आहे. दूध पावडर निर्यातीस प्रति किलो ४० रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रासायनिक खते व औषधांच्या वापरामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढत असल्याने सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. बंदी असलेल्या कीटकनाशकांच्या तपासणीचे अधिकार तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘व्हिलेज, नॉलेज, कॉलेज’ अभियान
दरवर्षी कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी शिवारात जाऊन अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करत असतात. मातीचे नमुने, खतांची मात्रा याबाबत हे विद्यार्थी शेतकºयांशी संवाद साधतील. त्यांनी शिक्षण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग ते शेतकºयांना करून देणार आहेत. शेतकºयांच्या नेमक्या अडचणी विद्यार्थ्यांना कळाव्यात यासाठी ‘व्हिलेज, नॉलेज, कॉलेज’ अभियान राज्यभर राबविण्यात येणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.

 

Web Title: Give milk to sugar as per sugar - Sadabhau Khot: The demand for the state-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.