लॉकडाऊनपूर्वी रिक्षाचालकांना दहा हजारांची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:24 AM2021-04-13T04:24:54+5:302021-04-13T04:24:54+5:30
सांगली : लॉकडाऊन सुरू करायचा असल्यास रिक्षा चालकांना दहा हजार रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली. जिल्हाधिकारी ...
सांगली : लॉकडाऊन सुरू करायचा असल्यास रिक्षा चालकांना दहा हजार रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.
संघटनेचे अध्यक्ष महेश चाैगुले यांनी सांगितले की, कोरोना ससंर्ग रोखण्यासाठी पुन्हा कडक लॉकडाऊनचा विचार सरकारच्या स्तरावर सुरू आहे. या संकटकाळात रिक्षा चालक मरणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायला हवी. पहिल्या लॉकडाऊन काळात रिक्षा व्यावसायिक पूर्णत: कोलमडला आहे. वर्षभर व्यवसाय बंद राहिल्याने रिक्षाचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लावल्यास आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावेत. महामारी व लॉकडाऊन काळात त्याला जगविण्याची जबाबदारी सरकारची आहे.
निवेदन देण्यासाठी रफिक जमादार, अरीफ शेख, बंडू तोडकर, मोहसीन पठाण, महेश सातवेकर, रफिक खतीब, मारुती सलगर हेदेखील उपस्थित होते.