कोळी समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

By संतोष भिसे | Published: November 3, 2023 05:55 PM2023-11-03T17:55:30+5:302023-11-03T18:22:59+5:30

जळगाव येथे महिन्याभरापासून अन्नत्याग आंदोलन सुरु

Give Scheduled Tribe certificate to Koli community, protests in front of Sangli Collectorate | कोळी समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

कोळी समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

सांगली : कोळी समाजातील सर्वच घटकांना अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी महर्षी वाल्मिकी अनुसुचित कोळी समाज संस्थेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

आंदोलनात मोठ्या संख्येने पुरुष व महिलांनी सहभाग घेतला. अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे आणि वैधता प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी जळगाव येथे महिन्याभरापासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. सांगलीतील आंदोलनात त्याला पाठिंबा देण्यात आला.

जिल्हाध्यक्षा शैलजा कोळी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, जळगाव येथे महिनाभर आंदोलन सुरु असतानाही शासनाने दखल घेतलेली नाही. ही बाब निषेधार्ह आहे. कोळी समाजाला अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्याशिवाय वैधता केली जात नाही. या अटी रद्द कराव्यात.

आंदोलनात हिम्मत कोळी, सदाशिव कोळी, राजेंद्र कोळी, संतोष कोळी, जयसिंग कोळी, संजयकुमार कोळी, अमोल धांद्रेकर, नरेंद्र कोळी, बाळासाहेब कोळी, शोभा कोरे, सुप्रिया कोळी आदी सहभागी झाले.

Web Title: Give Scheduled Tribe certificate to Koli community, protests in front of Sangli Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली