आरआयटी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:11+5:302021-04-26T04:23:11+5:30
इस्लामपूर : कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर डिप्लोमा विभागाचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या हिवाळी परीक्षा २०२०मध्ये यशस्वी ...
इस्लामपूर : कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर डिप्लोमा विभागाचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या हिवाळी परीक्षा २०२०मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे तंत्रनिकेतन पदविका परीक्षेमध्ये कोरोनासारख्या महामारीमध्येही सर्व विभागांची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही आरआयटीने कायम राखली. महाविद्यालयाने राबवलेल्या विविध ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा विद्यार्थ्यांना लाभ झाला.
या परीक्षेमध्ये तृतीय वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात निखील शेंडगे (९७.४३ टक्के), सुरज चव्हाण (९६ टक्के), संवेद सावंत (९५.५२ टक्के), ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागात वीरहर्षवर्धन पाटील (९६.३२ टक्के), निखील सूर्यवंशी (९५.५८ टक्के), प्रथम मलगुंडे (९३.२६ टक्के), सिव्हील इंजिनिअरिंग विभागात शिवम माळी (९७.३० टक्के), निजाम मदभावी (९७.१० टक्के), शरद नरुटे (९६.८० टक्के) व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात साधना गावडे (९६.८० टक्के), निहाल मुलाणी (९३.२० टक्के), स्वालिहा मुल्ला (९२.२० टक्के) गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
व्दितीय वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात विश्वजीत पाटील, श्रीमान पाटील, ऋषिकेश पाटील. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागात विनायक सावंत, हर्षव चिकाणी, निदा सुतार, सिव्हील इंजिनिअरिंग विभागात श्रीजीत माळी, ऐश्वर्या पाटील, ओंकार मंडले व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात वरदराज जाधव, अंकिता पाटील, प्रतीक्षा आवटी यांनी यश मिळवले.
प्रथम वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात आदित्य जाधव, अक्षत कांबळे, प्रणव शिंदे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागात समर्थ चव्हाण, अकिल तांबोळी, शैलेंद्र वडार, सिव्हील इंजिनिअरिंग विभागात आदित्य शिंदे, अदिती नलवडे, यशराज शिंदे व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ओंकार जाधव, प्रसन्ना टोमके, समृध्दी पाटील यांनी यश मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्रा. आर. डी. सावंत, विश्वस्त शामराव पाटील, संचालिका डॉ. एस. एस. कुलकर्णी, डीन डिप्लोमा डॉ. एच. एस. जाधव व रजिस्ट्रार एस. डी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.