येलूरमध्ये आज शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:52+5:302020-12-15T04:42:52+5:30
सांगली : राज्याचे शिक्षक नेते, माजी आ. शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रयोगशील आदर्श पाच शिक्षकांचा राज्यस्तरीय ‘जीवन ...
सांगली : राज्याचे शिक्षक नेते, माजी आ. शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रयोगशील आदर्श पाच शिक्षकांचा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन दि. १५ डिसेंबर रोजी येलूर (ता. वाळवा) येथे गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी दिली.
ते म्हणाले, शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनी गुणवत्तापूर्ण राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले (सोलापूर), राशीद टपाल (सांगली), कॅथरीन परेरा (पालघर), शिवचंद्र पांचाळ (लातूर), नरेश सावंत (रायगड) यांना देण्यात येणार असून, यावेळी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष शिक्षक संघ विकास शिंदे, तरुण मंडळ अध्यक्ष सुनील गुरव, जिल्हा सरचिटणीस वसंतराव सावंत आदींसह शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
चौकट
अण्णांनी शिक्षकांचे जीवनमान उंचावले
शिवाजीरावअण्णा पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने देशातील व राज्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांची प्रतिष्ठा वाढविली. त्यांनी शिक्षकांचे जीवनमान उंचावले. त्यांनी शिक्षकांना एक वेगळी ओळख करून दिली. १०० वर्षापेक्षा जास्त इतिहास असणारी शिक्षक चळवळ अतिशय कौशल्याने चालवली.