आटपाडीतील १६ लाखांचा बकरा अखेर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:30+5:302020-12-30T04:35:30+5:30
आटपाडीत कार्तिक पौर्णिमेला प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या यात्रेतून या बकऱ्यास सोमनाथ जाधव यांनी १६ लाख रुपये किमतीला खरेदी केले होते. ...
आटपाडीत कार्तिक पौर्णिमेला प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या यात्रेतून या बकऱ्यास सोमनाथ जाधव यांनी १६ लाख रुपये किमतीला खरेदी केले होते. या सोळा लाख रुपये किमतीच्या बकऱ्याची शनिवारी पहाटे जाधव यांच्या शेगदार मळा परिसरातील शेडमधून चोरी झाली होती. आलिशान माेटारीतून चोरट्यांनी हा बकरा लंपास केला होता. याची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. आटपाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून बकऱ्याच्या चोरीचा छडा लावला. कऱ्हाड येथून दोन संशयित आरोपी व एक अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित अमोल दत्तात्रय जाधव व सुदाम दीपक नलवडे यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी बकरा चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन बकरा ताब्यात घेतला.
बकरा ताब्यात मिळताच आटपाडीत शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण करत वाजत गाजत बकऱ्याचे स्वागत केले. बकऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाल्याने पोलिसांचे अभिनंदन केले.
सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, आमदार राम खाडे, नंदकुमार पवार, राम मोरे यांचा आटपाडीच्या सरपंच वैशाली पाटील, धनंजय पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह नागरिकांनी सत्कार केला.
फोटो-१)२८आटपाडी१
२)२८अमोल जधाव
३)२८सुदाम नलवडे