शहरात रस्त्यावरून जाताय? सावधान, खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:49+5:302021-07-20T04:19:49+5:30
फोटो : सुरेंद्र दुपटे, १९ दुपटे ३, ४, ५ शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात पावसामुळे ...
फोटो : सुरेंद्र दुपटे, १९ दुपटे ३, ४, ५
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषत: उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचून रहात असल्याने खड्ड्यांचा अंदाजच वाहनचालकांना येत नाही. पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त शहर करण्याच्या प्रशासनाचा निर्धार फोल ठरला आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत असून अनेकांना पाठदुखीचा त्रासही सुरू झाला आहे.
चौकट
या रस्त्यावर गती कमी ठेवलेलीच बरी
जुना कुपवाड रोड
अहिल्यादेवी होळकर चौकापासून लक्ष्मी देऊळकडे जाणाऱ्या जुन्या कुपवाड रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. चौकातील या खड्ड्यात पावसाळ्याचे पाणीही मोठ्या प्रमाणात साचले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहानमोठे खड्डे आहेत. हा रस्ता काही महिन्यापूर्वीच डांबरी करण्यात आला होता. तरीही रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
चौकट
सिव्हिल रोड
शासकीय रुग्णालय चौकातून शंभरफुटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यात रस्त्याकडे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झाले आहे. त्यातच अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्यावरही वाहनाचा वेग कमीच ठेवलेला बरा, अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
चौकट
वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली
१. शंभरफुटी रस्त्यावरून दिवसभरात तीन ते चारवेळा कामानिमित्त ये- जा करतो. पावसाचे पाणी व खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. - बबन नरंदे
२. खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू आहे. त्याशिवाय वाहनांचे नुकसान होते, ते वेगळेच. महिन्याच्या उत्पन्नातील काही रक्कम त्यावर खर्च करावी लागते. - सुभाष चव्हाण
चौकट
खड्ड्यांमुळे मणक्याचा त्रास
पावसाळ्यात खड्ड्याचा अंदाज येत नाही. चारचाकीपेक्षा दुचाकीधारकांना खड्ड्याचा त्रास अधिक होतो. खड्ड्यात वाहन गेल्यास मणक्याला झटका बसू शकतो. त्यासाठी दुचाकीवर ताठ बसावे. तसेच खड्ड्यातून वाहन सावकाश चालवावे. - डाॅ. गिरीश शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ
चौकट
कोट
सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. पावसाळ्यापूर्वीच पॅचवर्कचे काम हाती घेतले होते. निम्म्याहून अधिक शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले आहेत. गेली तीन ते चार दिवस पावसामुळे काम थांबले आहे. पावसाची उघडीप मिळताच पुन्हा पॅचवर्कचे काम हाती घेणार आहोत. - आप्पा हलकुडे, नगर अभियंता, महापालिका