गोकुळ मवारे ‘मोहरम केसरी’चा मानकरी
By admin | Published: October 15, 2016 11:28 PM2016-10-15T23:28:27+5:302016-10-15T23:28:27+5:30
खानापूर कुस्ती मैदान : सात लाखांच्या बक्षिसांची खैरात, वसंत केंचे जखमी, स्पर्धेला दिग्गजांची उपस्थिती
ंखानापूर : खानापूर येथे खास मोहरमनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा मल्ल गोकुळ मवारे याने विजय गुटाळ (गंगावेस) याला चितपट करीत ‘मोहरम केसरी’ व एक लाख रूपयांचे इनाम पटकाविले. मैदानात सहा ते सात लाख रूपयांची बक्षिसे वाटण्यात आली.
यावेळी गोकुळ मवारे (पुणे) विरूध्द विजय गुटाळ (गंगावेस) यांच्यातील ही कुस्ती सुरूवातीपासूनच आक्रमक राहिली. पाचव्या मिनिटास गोकुळ मवारे याने विजय गुटाळ याला एकलांग डावावर अस्मान दाखविले. गोकुळ मवारे यास कुस्ती समितीने ‘मोहरम केसरी’ किताबाने गौरविले.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती बेणापूरच्या बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्राचा मल्ल आप्पा बुटे विरूध्द भारत मदने यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्तीसाठी पंचाहत्तर हजार रूपयांचे बक्षीस ठेवले होते.
तृतीय क्रमांकासाठीची कुस्ती जालिंदर म्हारगुडे विरूध्द वसंत केंचे यांच्यात झाली. या कुस्तीत वसंत केंचे जखमी झाला. अखेरीस जालिंदर म्हारगुडे याला विजयी घोषित करण्यात आले. या कुस्तीसाठी दिनकर बापूसाहेब भगत यांच्या स्मरणार्थ कुस्ती संघटक शहाजी भगत यांनी साठ हजारचे बक्षीस ठेवले होते. चौथ्या कुस्तीत दत्ता नरळे याने नवनाथ इंगळे याला चितपट करीत पन्नास हजाराचे इनाम पटकाविले.
दहा हजार रूपये इनामाच्या कुस्तीत लखन पांढरे याने आकाश तरडे याला चितपट केले. दहा हजार रूपयांच्या कुस्तीतील विजेते : गुंडा करांडे विजयी विरुध्द दत्ता आमणे , अक्षय तरंगे वि. वि. सागर मगदूम, सचिन लोटे वि. संग्राम साळुंखे , दत्ता देवकर वि. वि. सूरज माने, कृष्णा नागवे वि. अमोल देवकाते, मंझूर शेख वि. वि नामदेव करांडे, लक्ष्मण थोरात वि. निवास म्हारगुडे. पाच हजारचे विजेते :- सूरज मुलाणी वि. राहुल सुडके, सयाजी कोळेकर वि. नंदकुमार लवटे, सिध्दनाथ आमणे वि. अभिजित मोरे, मनोज माने वि. आकाराम कोळेकर, राहुल पाटील वि. संजय मोरे . प्रारंभी श्रीफळापासून ते एक हजार रूपये बक्षिसासाठी सर्व कुस्त्या निकाली झाल्या. याचवेळी राष्ट्रीय कुस्ती संघटक शहाजी भगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदाशिवराव पाटील, मोहनराव कदम, सुहास शिंदे, भाऊसाहेब पाटील, पोलिस निरीक्षक मोहनराव जाधव, पो.उ. स्वप्नील घोंगडे, अमोल शिंदे यांनी भेट दिली. संयोजन माणिकराव भगत, रामभाऊ देसाई, रामभाऊ गिड्डे, दौलत भगत, सुरेश भगत, व्यंकट भगत, हमजेखान तांबोळी, रामचंद्र शिंदे, अमिन पिरजादे, जोतिराम ताटे, सुधाकर भगत, बजरंग पोरे, रफिक पिरजादे यांनी केले. (वार्ताहर)
स्पर्धा रंगतदार...
खानापूर येथे मोहरमनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. पुरातन मॉँसाहेब दर्ग्यात या उद्घाटन जुन्या पिढीतील मल्ल बाबूराव पिरजादे यांच्याहस्ते झाले. मैदानातील मोठी एक लाख इनामाची कुस्तीने स्पर्धेत रंगत आणली.