सोनार समाजाने संघटित होऊन प्रश्न सोडवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:13+5:302020-12-15T04:42:13+5:30

विटा : सोनार समाजाने एकत्रित येऊन आपल्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत. त्यासाठी पांचाळ सोनार समाज महामंडळ समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे ...

The goldsmith community should unite and solve the problem | सोनार समाजाने संघटित होऊन प्रश्न सोडवावेत

सोनार समाजाने संघटित होऊन प्रश्न सोडवावेत

Next

विटा : सोनार समाजाने एकत्रित येऊन आपल्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत. त्यासाठी पांचाळ सोनार समाज महामंडळ समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. समाजाने संघटित राहून प्रश्न सोडविले पाहिजेत, अशी अपेक्षा खानापूर तालुका सोनार समाज महामंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दीक्षित यांनी व्यक्त केली.

विटा येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर पोतदार, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पोतदार उपस्थित होते.

प्रकाश पोतदार यांनी, सोनार समाजाच्या अडचणी दूर होण्यासाठी आपली राज्य संघटना काम करीत आहे, या संघटनेमार्फत तळागाळातील सोनार समाजबांधवांना मदत करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.

ज्ञानेश्वर पोतदार यांनी, सोनार समाजाने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून समाजाने एकत्रित यावे, ग्रामीण व शहरी सोनार समाजबांधवांनी योग्य तो समन्वय ठेवावा, असे आवाहन केले.

यावेळी सोनार समाज संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सविता राजेंद्र दीक्षित यांची निवड करण्यात आली. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष धनंजय क्षीरसागर व राज्य उपाध्यक्ष रामानंद तपासे यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीस राजेंद्र दीक्षित, प्रभाकर क्षीरसागर, सुहास पंडित, महेश दीक्षित, प्रकाश महामुनी, निळकंठ दीक्षित, संजय धर्माधिकारी, संकेत दीक्षित, दत्तात्रय दीक्षित, मधुकर वेदपाठक, मिलिंद पंडित, राजकुमार महामुनी, श्रध्दा दीक्षित आदी उपस्थित होते. निळकंठ दीक्षित यांनी आभार मानले.

फोटो - १४१२२०२०-विटा-सोनार समाज :

फोटो ओळ :

विटा येथे महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज संघटनेच्या बैठकीवेळी श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The goldsmith community should unite and solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.