चांगल्या पावसाने जतमधील शेतकऱ्यांच्या आपेक्षा उंचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:27+5:302021-07-12T04:17:27+5:30
मार्च २०१९ पासून कोरोनाच्या संक्रमणामुळे अवघे जग वेठीस धरले गेले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागही कोरोनाच्या आजारामुळे मेटाकुटीस आला ...
मार्च २०१९ पासून कोरोनाच्या संक्रमणामुळे अवघे जग वेठीस धरले गेले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागही कोरोनाच्या आजारामुळे मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटातच मागील वर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. यंदाच्या मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात झाली. यानंतर झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार पर्जन्यमान समाधान कारक राहणार असल्याने मेटाकुटीला आलेला बळीराजासुद्धा या वर्षात पीक चांगले येणार या आशेवर उसनवारी करून बियाणे खरेदी केले आहे. जत तालुक्यातील शिवारात यंदा गतवर्षीपेक्षा लवकर पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकरी सुखावले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाची पेरणी केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा लागली आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
चाैकट
गतवर्षी अतिवृष्टीचा फटका
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने गेल्या वर्षी पेरण्या केल्या खऱ्या. मात्र, बोगस बियाणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतर वेळोवेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सरत्या शेवटी हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला. प्रशासनाने पंचनामे करून मदत जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांना कमी मदत मिळाली.