शिराळा तालुक्यात संचारबंदीला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:49+5:302021-04-16T04:26:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यात संचारबंदीच्या पहिला दिवस कडकडीत बंदसारखा पाळण्यात आला. किराणा दुकाने ग्राहक नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात संचारबंदीच्या पहिला दिवस कडकडीत बंदसारखा पाळण्यात आला. किराणा दुकाने ग्राहक नसल्याने व एस. टी. सेवा प्रवासी नसल्याने बंद असल्यासारखीच होती. विनाकारण फिरणाऱ्यांकडून १५ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
तालुक्यात सर्व गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घराबाहेर पडणाऱ्यांची चौकशी करण्यात येत होती. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. गावाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनावश्यक फिरणाऱ्यांना आळा बसला तरीही त्यातून अनेकजण कारणे सांगून गावात फिरत होते. विनाकारण फिरणाऱ्यांकडून १५ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दंडही वसूल करण्यात आला.
तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल आदींनी पाहणी केली.
शिराळा शहरातील सर्व व्यवसाय पूर्ण बंद होते. सोमवार पेठ, कुरणे गल्ली, लक्ष्मी चौक, बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. शेडगेवाडी, आरळा, कोकरूड, चरण, मांगले, सागाव , चिखली , शिरशी, वाकुर्डे आदी गावांमध्ये ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सर्व बंद होते. एस.टी.च्या दोन फेऱ्या झाल्या, मात्र इतर सर्व बसेस बंद होत्या.