गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला, सांगलीत कंटेनर अरुंद गल्लीत शिरला; दहा दुचाकींना धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 04:41 PM2024-10-11T16:41:07+5:302024-10-11T16:41:30+5:30
सांगली : गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कंटेनर अरुंद गल्लीत शिरला. दहा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे ९५ ...
सांगली : गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कंटेनर अरुंद गल्लीत शिरला. दहा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे ९५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शहरातील कर्नाळ चौकी ते मगरमच्छ कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावर बुधवारी रात्री सुमारास घडली. याबाबत सांगली शहर पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्नाटकातून आलेला कंटेनर साताराकडे निघाला होता. अर्जुन देवाप्पा देवकर (रा. खटाव, जि. सातारा) हा चालक होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला बायपास रस्ता माहित नसल्याने त्याने गुगल मॅप लावला होते. पण गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने तो मगरमचछ कॉलनीतील बागवान हॉल रस्त्यावर कंटेनर घातला.
आधीच रस्ता अरुंद आहे. रस्त्याकडेला नागरिकांनी दुचाकी लावलेल्या होत्या. कंटेनरने रस्त्यावरील दहा दुचाकीला धडक दिली. यात १० दुचाकीचे ९५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. चालक नशेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी रात्री कंटेनर चालकावर किरकोळ अपघाताचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.