गोपीचंद पडळकर यांना अटक

By admin | Published: July 18, 2014 11:29 PM2014-07-18T23:29:32+5:302014-07-18T23:31:50+5:30

आटपाडीत समर्थकांची रॅली : ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हे, १0 जणांना अटक

Gopichand Padalkar arrested | गोपीचंद पडळकर यांना अटक

गोपीचंद पडळकर यांना अटक

Next

आटपाडी : दरोड्याचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर आज, शुक्रवारी आटपाडी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना अटक केल्यानंतर अटकेच्या निषेधार्थ रासपच्या कार्यकर्त्यांनी आटपाडीत दुचाकींची रॅली काढली. पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात घोेषणाबाजी केली. पोलिसांवर दबाव आणल्याबद्दल ५०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा आटपाडी पोलिसांनी १० कार्यकर्त्यांना अटक केली. पडळकर यांची दि. २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
दि. २४ मे २०१४ रोजी खरसुंडी (ता. आटपाडी) येथील कटरेवस्तीजवळ पूर्वीच्या भांडण्याच्या कारणातून आणि लग्नात वाद होऊन मारामारी झाली होती. त्यामध्ये सखुबाई पांडुरंग थोरात यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद गोरख राजाराम काळे (रा. पिंपरी बुद्रुक) यांनी दिली होती. फिर्यादीनुसार गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर, राजू अर्जुने, जगन्नाथ जानकर, रमेश दशरथ कातुरे, मधु कातुरे, विनोद वाघमारे, सुभाष चोपडे, दत्ता जावीर यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी सुभाष चोपडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे, तर फरारी असलेले गोपीचंद पडळकर आणि विनोद लवाजी वाघमारे (दोघेही रा. झरे) यांना आटपाडी पोलिसांनी आज
अटक केली.
दरम्यान, रासपचे कार्यकर्ते सकाळपासून पंचायत समिती कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने जमले होते. अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळल्याने पडळकर आटपाडी पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी आटपाडीच्या मुख्य बाजारपेठेतून गृहमंत्री पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत दुचाकी रॅली काढली. पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. आटपाडीचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे पडळकर यांच्या मागावर सकाळपासून होते. त्यामुळे पडळकर आणि पोलीस एकाचवेळी हजर झाले. तोपर्यंत कार्यकर्त्यांना पोलिसांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थोपवून धरून आत येण्यास मनाई केली. (पान ९ वर)

Web Title: Gopichand Padalkar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.