सांगलीत राडा! भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 10:24 PM2021-11-07T22:24:02+5:302021-11-07T22:25:10+5:30

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.

gopichand padalkar car attack after clash between bjp shiv sena ncp workers in sangli | सांगलीत राडा! भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला

सांगलीत राडा! भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला

googlenewsNext

सांगली:सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. यानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या प्रकरणात एका कार्यकर्त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. 

राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटातील वादाचे मूळ कारण सांगली येथे होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या भारले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखताना दिसत आहे. आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या, असे सांगितले जात आहे. 

आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण असून वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात असून पोलिसांनी आपली कुमक वाढवली आहे. या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यास गंभीर दुखापत झाली आहे. जखमी राजू जानकर यांनी आमदार पडळकर यांच्यावर शिवीगाळ करत दुखापत केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीदेखील गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. 

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २५ ऑक्टोबर रोजी पार असून, तर ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी आहे.
 

Web Title: gopichand padalkar car attack after clash between bjp shiv sena ncp workers in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.