गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:50 PM2024-04-26T16:50:04+5:302024-04-26T16:50:42+5:30

संजय पाटील यांनी किती केला होता खर्च..वाचा

Gopichand Padalkar spent the most in the 2019 Sangli Lok Sabha elections, Vishal Patil is second | गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर 

गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर 

सांगली : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या खर्चाचा हिशेबही सादर करावा लागतो. दुसरीकडे निवडणुकीपूर्वी प्रशासनाकडून विविध वस्तू, सेवांचे दरपत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार उमेदवाराने दिलेल्या खर्चाचा ताळमेळ घालून खर्च मंजूर केला जातो. २०१९ची सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी झाली होती. यात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सर्वाधिक खर्च केल्याची नोंद आहे.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार चुरस दिसून आली. त्यामुळे प्रचारावरील खर्चाचा आलेखही वाढला. प्रशासनाकडे सादर झालेल्या अहवालानुसार पडळकर सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार ठरले. दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील, तर तिसऱ्या क्रमांकावर संजय पाटील राहिले. यंदाची निवडणूकही तिरंगी होणार असल्याने सर्वाधिक खर्च कोण करणार, हासुद्धा चर्चेचा विषय आहे.

उमेदवारनिहाय निवडणूक खर्च

उमेदवार  -  सभा / रॅली / बैठका - प्रचारसाहित्य - वाहने  - कार्यकर्ते -  इतर  -  एकूण

गोपीचंद पडळकर - १४,४०,७७३ - ८८,९०० - २७,६५,६०० - २,५५,४२४ - १७,११, ५१३ - ६२,६२,२१०
विशाल पाटील - १२,९३,२१५ - ११,४०,६७२ - १५,७८,८०० - ३,५३,९९६ - ८,७६,३१४ - ५२,४२,९९७
संजय पाटील - १६,८९,०५६ - ९,५६,३५३ - ३,५५,७०० - ०  -  १७,२७,४९१ - ४७,२८,६००


प्रशासनाचे २०२४चे दरपत्रक असे

यंत्रणा -दर रु. प्रतिदिन
चित्रिकरण - २,५०० (४ तास)
ड्रोन कॅमेरा - ४,००० (४ तास)
स्पीकर - २,५०० (६ तास)
प्रोजेक्टर, स्क्रिन - २,०००
बेंजो - ७,०००
छोटी स्क्रीन वाहने - ७,५००
मोठी स्क्रीन वाहने - १०,५००
ढोल-ताशा - १२,०००
लेझीम पथक - १०,०००
पथनाट्य - १०,०००

Web Title: Gopichand Padalkar spent the most in the 2019 Sangli Lok Sabha elections, Vishal Patil is second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.