तो आफ्रिकन मकाऊ पोपट पकडण्यात शासकीय यंत्रणेला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 06:41 PM2021-05-17T18:41:50+5:302021-05-17T18:44:16+5:30
Sangli Wlidlife - सांगलीतील बसस्थानक रोडवर माँडर्न बेकरीजवळील रेनट्रीवर रंगीबेरंगी आफ्रिकन मकाऊ पोपट बसला होता. त्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे अग्निशामक दल, पोलिस, महावितरण अशा सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होती. परंतु एक तासाचा कालावधी गेला पण पोपट उडून गेला. शासकीय यंत्रणेला अखेर मकाऊ पोपट पकडण्यात अपयश आले.
सुरेंद्र दुपटे
संजयनगर /सांगली ः सांगलीतील बसस्थानक रोडवर माँडर्न बेकरीजवळील रेनट्रीवर रंगीबेरंगी आफ्रिकन मकाऊ पोपट बसला होता. त्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे अग्निशामक दल, पोलिस, महावितरण अशा सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होती. परंतु एक तासाचा कालावधी गेला पण पोपट उडून गेला. शासकीय यंत्रणेला अखेर मकाऊ पोपट पकडण्यात अपयश आले.
सांगलीतील बसस्थानकाजवळ एका रेनट्रीवर रविवारी १२:४५ वाजता रंगीबिरंगी आफ्रिकन मकाऊ पोपट दाखल झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिस फौजफाटा दाखल झाला. यानंतर महानगरपालिकेचे अग्निशामक यंत्रणा सज्ज झाली, नंतर महावितरण कर्मचारी, महापालिकेच्या अग्निशामक दलाने मकाऊ पोपट पकडण्यासाठी सुरुवात केली.
सुमारे एक तास प्रयत्न सुरु होते. वाहतूक पोलीस वाहतूक थांबवित होते. वाहतूक शाखेच्या साहयक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, सिटीचे पोलीस निरीक्षक अजय सिदंकर, अग्निशामन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे हे घटनास्थळी उपस्थित होते. शेवटी मकाऊ पोपट आकाशात उडून गेला. या ठिकाणी सज्ज असलेल्या शासकीय यंत्रणेला अखेर मकाऊ पोपट पकडण्यात अपयश आले.