चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:23 PM2022-02-01T14:23:41+5:302022-02-01T14:33:35+5:30

धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

Government approves budget of Rs. 54 crore 85 lakh 83 thousand 683 to stop leakage of Chandoli dam | चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य

चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य

googlenewsNext

वारणावती : चांदोली धरणाची गळती थांबविण्यासाठी शासनाने ५४ कोटी ८५ लाख ८३ हजार ६८३ रूपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरण हे मातीचे राज्यातले दोन नंबरचे धरण आहे. २००२मध्ये धरणाच्या वक्राकार दरवाजाचे काम पूर्ण झाल्यानंतर ९७४.२१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३४.४० टीएमसी इतका प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाला. त्यातील ७७९.२१ दशलक्ष घनमीटर म्हणजे २७.५२२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

चांदोली धरणातील पाणी साठवण सुरू झाल्यापासून धरणातून गळती सुरू आहे. त्यातून लाखो लीटर पाणी वापराविना वाया जात आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने गळती नियंत्रणात आणण्यासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाला विशेष दुरूस्ती अंतर्गत ५४ कोटी ८५ लाख ८३ हजार ६८३ रूपयांच्या अंदाजपत्रकाला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ही मंजुरी देताना धरणाच्या निकृष्ट दर्जाबाबत जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर आवश्यक जबाबदारी निश्चितीची व अनियमिततेची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी व समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करावी, या अटी, शर्तीसह १४ अटी अंदाजपत्रकात देण्यात आल्या आहेत.

राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण

राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण असणाऱ्या या वारणा (चांदोली) प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात १९७६पासून सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१६मध्ये ११७४.९८ कोटी किमतीला तृतीय सुधारित मान्यता मिळाली. मार्च २०२० अखेर ८५०.२८ कोटी खर्च झाला. उर्वरित किंमत ३२४.७० कोटी आहे. तृतीय मंजूर सुप्रमाप्रमाणे २०४.७५ कोटी इतकी तरतूद असूनही १९१.७० कोटी खर्च झाला. वारणा नदीच्या पात्रात हे धरण असून, ते मातीचे आहे. त्याची एकूण लांबी १,५८० मीटर असून, पैकी ८३१.५० मीटरचा भाग मातीचा व उर्वरित ७४८.५० मीटरमध्ये दगडी धरण बांधण्यात आले आहे.

Web Title: Government approves budget of Rs. 54 crore 85 lakh 83 thousand 683 to stop leakage of Chandoli dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.