इस्लामपुरातील २.८० कोटींच्या कामांना शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:59+5:302021-06-06T04:20:59+5:30

इस्लामपूर : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेंतर्गत इस्लामपूर नगरपालिकेस जाहीर झालेल्या बक्षिसाच्या रकमेतून २ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांना नगरविकास विभागाने ...

Government approves works worth Rs 2.80 crore in Islampur | इस्लामपुरातील २.८० कोटींच्या कामांना शासनाची मान्यता

इस्लामपुरातील २.८० कोटींच्या कामांना शासनाची मान्यता

Next

इस्लामपूर : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेंतर्गत इस्लामपूर नगरपालिकेस जाहीर झालेल्या बक्षिसाच्या रकमेतून २ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांना नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती स्वच्छता व आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांनी दिली.

ते म्हणाले, नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये १५ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. या रकमेतील काही निधी विकासकामांसाठी मंजूर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक कामे स्वच्छता व आरोग्य विभागाच्या संबंधित आहेत. यासाठी व उर्वरित निधी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य मिळाले. मंत्री तलावासाठी अजून ज्यादा रकमेची गरज आहे. ती रक्कम व उर्वरित बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

ते म्हणाले की, शासन निर्णयाप्रमाणे शहरातील सर्व विकासकामे राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीकडून वेळेत पूर्ण केली जातील. सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत.

चौकट

अशी आहेत मंजूर विकासकामे

मंत्री तलाव सुशोभिकरण : ६३ लाख ३८ हजार ९८९ रुपये.

ट्रॅक्टर एसटीपी पंप : ६ लाख ७००.

स्वच्छतागृह : ४२ लाख २० हजार.

चार सिटचे फिरते शौचालय : ४४ लाख.

ट्रॅक्टर ट्रॉली : २६ लाख १२ हजार १३६.

धूर फवारणी मशीन : ४ लाख ६० हजार ७९२.

स्वच्छतागृह स्वतंत्र चार ब्लॉकसाठी : ९३ लाख ३२ हजार ११७.

एका व दोन व्यक्तींसाठीची स्वच्छतागृहे प्रत्येकी दहा ठिकाणी, तर चार सिट्ची फिरती शौचालये दहा नग.

Web Title: Government approves works worth Rs 2.80 crore in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.