शिरगाव-कवठेएकंद रस्त्यावर आढळली शासकीय औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:55+5:302021-06-11T04:18:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कवठे एकंद : कवठे-एकंद ते शिरगाव (ता. तासगाव) रस्त्याच्या कडेला शेतामध्ये शासकीय रुग्णालयातील औषधे फेकल्याचा धक्कादायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे एकंद : कवठे-एकंद ते शिरगाव (ता. तासगाव) रस्त्याच्या कडेला शेतामध्ये शासकीय रुग्णालयातील औषधे फेकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या अशा गैरप्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासकीय औषधे शेत रस्त्याच्या कडेला कचऱ्याप्रमाणे फेकून दिल्याचे दिसून आले. सध्या कोरोना पार्श्वभूमीमुळे वैद्यकीय सेवा सुविधा, औषधांबाबत सर्वत्र जागरूकता निर्माण झाली आहे. असे असताना मात्र शासकीय आरोग्य केंद्रात वापरात असणारी गोळ्या, औषध, ओआरएस पावडर अशी मुदतबाह्य औषधे फेकून दिली असल्याचे आढळून आले आहे.
कवठेएकंद ते शिरगाव रस्त्यावरील शेत भागातील रस्त्यावर जास्त रहदारी वाहतूक नसते. यामुळेच कदाचित आरोग्य विभागातील वापर न केलेली औषधे नागरिकांना वापरात न आणता अशी उघड्यावर फेकून देऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे.
शेत रस्ता परिसरात नागरिकांची व शेतकऱ्यांची, तसेच जनावरांची ये-जा असते. अशी मुदतबाह्य गोळ्या औषधे कदाचित वापरली जाऊन बाधा होण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीसारख्या तोंड देत असताना एकीकडे औषध गोळ्यांचा तुटवडा, बेडची कमतरता असे चित्र आहे. दुसरीकडे शासकीय औषधे अशी गरजूंना न वापरता फेकून दिल्याचे प्रकार आढळून आला आहे.
आरोग्य विभागाच्या अशा गैरप्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.