शासनाचे धोरण शेतीविषयक चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:47 AM2021-02-18T04:47:37+5:302021-02-18T04:47:37+5:30
कुंडल (ता. पलूस) येथे झालेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. ...
कुंडल (ता. पलूस) येथे झालेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार लाड म्हणाले, आपल्याकडे बागायत क्षेत्र जास्त असल्याने अद्याप ती झळ पोहोचली नव्हती; पण निर्यात द्राक्ष अनुदान शासनाने बंद केले. यामुळे बागायतदारांनी एका पेटीला ३० रुपये भाव कमी मिळाला. यातून शासन शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. आगामी काळात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागणार आहे.
उदय नारकर म्हणाले, या कायद्याने २५ लाख कोटींची बाजारपेठ व्यापाऱ्यांना मुक्त केली असून, कॉन्ट्रॅक्ट शेतीने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.
धनाजी गुरव म्हणाले, विकासाची भाषा करीत मोदी सरकार सहकार चळवळ मोडीत काढीत आहे. याची जाण ठेवून सहकारी उद्योगाने या चळवळीत पुढाकाराने उतरले पाहिजे.
प्रा. डॉ. बाबूराव गुरव, मारुती चव्हाण, दिगंबर कांबळे, माणिक अवघड, अशोक पवार, ॲड. अजित सूर्यवंशी, आदम पठाण यांनी मार्गदर्शन केले. उमेश देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ॲड. कृष्णा पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्ही. वाय. पाटील, शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, मारुती शिरतोडे, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. नरेंद्र खाडे, ॲड. सुधीर गावडे, किरण लाड, वसंतराव लाड, श्रीकांत लाड, वसंत लाड, शरद पाटील, आनंदी अवघडे, आदम पठाण, दिनकर सव्वाशे, आदी उपस्थित होते.
फोटो-१७पलुस१
फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे पुरोगामी संघटनांच्या बैठकीत आमदार अरुण लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, उदय नारकर, व्ही. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.