मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:20+5:302020-12-31T04:27:20+5:30

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. ...

The government is positive for the upliftment of the Matang community | मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक

Next

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. यावेळी मंत्री कदम बोलत होते.

ते म्हणाले की, राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या लक्षात घेऊन शासनस्तरावरून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविणे, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देणे, तसेच वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव असलेले वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अ. को. अहिरे, विभागाचे अवर सचिव सिद्धार्थ झाल्टे, समाजकल्याण निरीक्षक देवराम मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष विजय अंभोरे, मनोज कांबळे, सुरेश पाटोळे, ज्ञानेश्वर काळे, आदींसह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

फोटो-३०कडेगाव१

फोटो ओळ : मुंबई येथे मंत्रालयात सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली.

Web Title: The government is positive for the upliftment of the Matang community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.