वस्त्रोद्योगाला उभारी देणासाठी शासन सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:58+5:302021-03-21T04:25:58+5:30

फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सहकारी सूतगिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष महेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष ...

Government positive for upliftment of textile industry | वस्त्रोद्योगाला उभारी देणासाठी शासन सकारात्मक

वस्त्रोद्योगाला उभारी देणासाठी शासन सकारात्मक

Next

फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सहकारी सूतगिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष महेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष शांताराम कदम यांच्यासह संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

कडेगाव :

वस्त्रोद्योग व्यवसायातील जागतिक मंदीमुळे तसेच कोरोनाच्या महामारीने सर्वच वस्त्रोद्योग घटक आर्थिक मंदीचा सामना करीत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी व वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन सहकार कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूतगिरणीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. यावेळी कृषिराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. आ. मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, उपाध्यक्ष महेश कदम, इंद्रजित साळुंखे, कार्यकारी संचालक ए. बी. चालुक्य आदी उपस्थित होते.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, राज्यात आजवर १३० सूतगिरण्यांना शासनाने मान्यता दिली आहे. यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सूतगिरण्या सक्षम आहेत.

यामुळे सूतगिरण्यांना प्रतियुनिट ३ रुपये वीज दरात सवलत द्यावी. तसेच प्रतिचाती ३ हजार रुपये कर्ज वित्तीय संस्थांकडून देण्याबाबत राज्य शासनाचा वस्त्रोद्योग विभाग सकारात्मक विचार करीत आहे. या दोन्ही सवलती मिळाल्यास राज्यातील सूतगिरण्या आर्थिक संकटातून बाहेर पडतील.

उपाध्यक्ष महेश कदम यांनी प्रास्तविक केले.

फायनान्स मॅनेजर डी. ई. पवार यांनी अहवाल वाचन केले. सिराज पटेल यांनी सूत्रसंचालन केले. संचालक नरेंद पाटील यांनी आभार मानले.

चौकट

सध्या ५३ हजार ५६८ इतक्या चात्या उत्पादनाखाली असलेली व राज्यात अग्रेसर असलेली सागरेश्वर सूतगिरणी संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या नाव लौकिकास साजेशी कामगिरी करीत आहे.

गेली चार वर्षे अडचणींचा सामना करीत असतानाही सूतगिरणीने कामगारांचे पगार, लाइट बिल, बँकांचे हप्ते वेळच्या वेळी अदा केले आहेत, असे डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

Web Title: Government positive for upliftment of textile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.