मंदिरांबाहेरील पूजा साहित्य विक्रेत्यांनाही शासनाने मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:40+5:302021-06-05T04:19:40+5:30
०४ संतोष ०१ सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. लोकमत न्यूज ...
०४ संतोष ०१
सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मंदिर परिसरात पूजा साहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांनाही शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केली आहे. आमदार सुधीर गाडगीळ व आघाडीचे जिल्हा संयोजक अजयकुमार वाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
त्यांनी सांगितले, लॉकडाऊन काळात शासनाकडून विविध सामाजिक घटकांना मदत दिली जात आहे. मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विकणारे मात्र वंचित राहिले आहेत. सव्वा वर्षापासून मंदिरांचे दरवाजे बंद आहेत, त्यामुळे बाहेर पूजेचे साहित्य, हार, फुले, फोटो, प्रसाद आदी विकणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सण, उत्सव काळात व्यावसायिकांना चांगले अर्थार्जन होते, त्यावरही पाणी पडले आहे. उपासमारीमुळे कुटुंबांवर विपरीत परिणाम होत आहेत. दुकानांत अन्य व्यवसायदेखील सुरू करता येत नाही. त्यामुळे शासनाने त्यांची दखल घ्यायला हवी. रिक्षाचालक, बांधकाम मजूर यांच्याप्रमाणे या व्यावसायिकांनाही मदत दिली पाहिजे.
निवेदन देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, श्रीकांत शिंदे, अविनाश मोहिते, मोहन जामदार आदी उपस्थित होते.