शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकऱ्यांकडून सरकारचे 'महाळ', सांगलीत पाचशे जणांना घातले जेवण 

By अशोक डोंबाळे | Published: September 27, 2024 07:14 PM2024-09-27T19:14:40+5:302024-09-27T19:14:53+5:30

राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा

Government's Mahal by farmers for cancellation of Shaktipeeth highway, food served to 500 people in Sangli | शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकऱ्यांकडून सरकारचे 'महाळ', सांगलीत पाचशे जणांना घातले जेवण 

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकऱ्यांकडून सरकारचे 'महाळ', सांगलीत पाचशे जणांना घातले जेवण 

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या प्रमुख मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २७) सांगलीतील स्टेशन चौकात सरकारचे महाळ घातले. तसेच राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उलट-सुलट विधाने करून बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारचे स्टेशन चौकात महाळ घालून निषेध केला. यावेळी ५०० शेतकऱ्यांना जेवण देण्यात आले. त्याअगोदर प्रभाकर तोडकर यांनी शासनाच्या प्रतीकात्मक प्रतिमेला हार घालून विधिवत पूजा केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देऊन सरकारचा निषेध करून उपस्थित शेतकऱ्यांना भात, आमटी आणी शिरा असे जेवण दिले. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे, असे सांगत आहेत. दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री शिंदे हे फक्त नांदेड, कोल्हापूरचा विरोध आहे, असे विधान करत आहेत. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णयही घेतला आहे.

यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटिल, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

नितीन गडकरींना काळे झेंडे दाखविणार : उमेश दशमुख

जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. असे असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. म्हणून ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.

Web Title: Government's Mahal by farmers for cancellation of Shaktipeeth highway, food served to 500 people in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.