सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:36 PM2023-06-21T18:36:58+5:302023-06-21T18:37:27+5:30

कपातीवर शासकीय कर्मचारी म्हणतात..

Govt employees will get one day salary less next month | सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण

googlenewsNext

सांगली : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरीवर्गाला नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. शेतमालाचे कमी झालेले दर आणि वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरकारी कर्मचारीही सरसावले आहेत. पुढील महिन्यातील एक दिवसाचे वेतन यासाठी घेतले जाणार असून, कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यात या एक दिवसाच्या वेतनातून जमा झालेली रक्कम शेतकरी मदतीसाठी दिली जाणार आहे.

नुकसानग्रस्तांसाठी एक दिवसाची वेतन कपात

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.

अवकाळीचे जिल्ह्यात नुकसान किती?

जिल्ह्यात अवकाळी पावसाने तितके नुकसान केले नसले तरी हाता - तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाकडून त्याची मोजणी करून अहवाल देण्यात आला आहे.

कपातीवर शासकीय कर्मचारी काय म्हणतात?

आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले असल्याने वेतन कपातीला विरोध नाही. मात्र, शासनाने आमच्याही मागण्या मान्य कराव्यात. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास आम्ही जादाही मदत करू शकतो.
- सागर बाबर, अध्यक्ष, लिपीकवर्ग संघटना

शासनाने आदेश दिले आहेत. याबाबत गैर काहीही नाही. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही तयार आहोत .मात्र, त्याचवेळी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे. -पी. एन. काळे

आमच्या मदतीला कोण धावणार?

शेतकऱ्यांना नेहमीच नुकसान पोहोचत असते. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करून पैसे देण्याऐवजी शासनाने यावर ठोस उपाय शोधावेत. - सुदाम ढवळे, शेतकरी

शासनाने यासाठी विमा योजना लागू करून त्यावर पारदर्शी काम करावे, जेणेकरून कुणाचे वेतन कपात करून आम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. - अजित शिंदे, शेतकरी

Web Title: Govt employees will get one day salary less next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.