Sangli: म्हैसाळयोजनेतून शासनाचे पैसे, पाणी वायाच; मुख्य अभियंत्यांना विज्ञान मानेंनी धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:36 PM2024-03-27T13:36:40+5:302024-03-27T13:38:28+5:30
सुशांत घोरपडे म्हैसाळ : म्हैसाळ योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. म्हैसाळ योजनेच्या कामचुकार, बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे शासनाने लाखो लिटर ...
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : म्हैसाळ योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. म्हैसाळ योजनेच्या कामचुकार, बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे शासनाने लाखो लिटर पाणी व पैसे वाया जात असून अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सघटक विज्ञान माने यांनी केली. म्हैसाळ योजनेचे वरीष्ठ अधिकारी मुख्य अभियंता एम.एस.जीवने हे दोन दिवस म्हैसाळ योजनेच्या दौरावर होते. यावेळी माने यांनी अनेक प्रश्न विचारत मुख्य अभियंता जीवने यांना धारेवर धरले.
म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक एक ते पाच आवर्तन चालवणाऱ्या कामगाराचे गेल्या वर्षाच्या जुलै-आँगस्ट या दोन महिन्याचे पगार आठ महिने दिले गेले नाहीत. एका वर्षात सहा वेळा योजना यांत्रिक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ओव्हफ्लो झाली. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार कोण? नवीन एचओपीडी पँनल व्हाँल बसवल्यापासून ते व्हाँल फक्त ६५ टक्के उघडता. त्यामुळे त्यातून जेवढा डिचार्च जाणे आवश्यक आहे. तेवढा डिचार्ज पुढच्या टप्प्यावर जात नाही. त्यामुळे टप्पा क्रमांक एक येथे तीन पंप अनावश्यक चालत आहेत. एका पंपाचे विजबिल एका तासाला अडीच हजार रूपये येते. तीन पंपाचे महिन्याकाठी ५० लाख रूपये वीजबिल वाया जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाणी पट्टी भरूनही पाणी मिळत नाही. असा गंभीर आरोपही विज्ञान माने यांनी केला.
एम,एस,जीवने हे आमचे वरीष्ठ अधिकारी म्हैसाळ योजनेची पाहणी करण्यासाठी दौरावर आले आहेत. यामध्ये ते संपूर्ण म्हैसाळ योजनेची पाहणी करणार आहेत. - रोहित कोरे, मुख्य कार्यकारी अभियंता -म्हैसाळ योजना
एम,एस,जीवने हे वरीष्ठ अधिकारी दोन महिन्यात सेवा निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी या दोषी अधिकारी वर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. - विज्ञान माने, जिल्हा सघटक -राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट