दारिद्र्यरेषेचे प्रश्न ग्रामपंचायतींनी सोडवावेत

By Admin | Published: September 30, 2016 11:30 PM2016-09-30T23:30:37+5:302016-10-01T00:18:03+5:30

जयंत पाटील : नवेखेड येथून उपक्रमाचा प्रारंभ करण्याचे आवाहन; ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन

Gram Panchayats should resolve issues of poverty | दारिद्र्यरेषेचे प्रश्न ग्रामपंचायतींनी सोडवावेत

दारिद्र्यरेषेचे प्रश्न ग्रामपंचायतींनी सोडवावेत

googlenewsNext

इस्लामपूर : आम्हास कोण विचारत नाही, अशी साधारणपणे गोरगरीब समाजामध्ये भावना असते़ ही भावना कमी करण्यासाठी वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दर महिन्यास दारिद्र्यरेषेखालील ५ ते १0 कुटुंबांना बोलावून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा़ या उपक्रमाची सुरूवात नवेखेड गावाने करावी, असे आवाहन माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.
नवेखेड (ता़ वाळवा) येथे ४४ लाख रूपये खर्चून बांधलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे आ़ पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी दलित वस्ती सुधार योजना, गावातील गटार बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचा प्रारंभही करण्यात आला, याप्रसंगी आ़ पाटील बोलत होते़
जि. म. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ़ पाटील पुढे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आज विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यात आदर्शवत काम करीत आहेत. गावा-गावातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला गावाच्या विकास प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे़
ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमुळे गावाच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल़ आपण यापूर्वी पिण्याच्या पाण्याची योजना, सभागृह, गटारी यासह अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.
यावेळी उपअभियंता रामचंद्र चव्हाण, माणिक पाटील, डी़ ए़ पाटील यांचा आ़ पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शामराव पवार यांनी प्रास्ताविक केले. माजी कामगार संचालक राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले़ प्रा़ बी़ डी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले़
याप्रसंगी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, डी़ बी़ पाटील, बाबूराव चव्हाण, सरपंच सौ़ भारती जाधव, उपसरपंच रवींद्र चव्हाण, माजी सरपंच सौ़ शीतल पाटील, सौ़ छाया जाधव, बी़ ए़ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चव्हाण, बालाजी निकम, सयाजी कदम, हरिभाऊ पाटील, सुहासकाका पाटील, बँकेचे संचालक धनाजी पाटील, रंगराव पाटील, बाबासाहेब पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, ग्रामसेवक एस़ एस़ पाटील उपस्थित होते.(वार्ताहर)

मतदारसंघ : एकच
नवेखेड व जुनेखेड या दोन्ही गावांचा वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदार संघात समावेश झाल्याचे दिसते़ मात्र ही दोन्ही गावे पूर्वीपासून एकच असल्याने ही गावे कोणत्याही एकाच मतदार संघात येण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी
सांगण्यात आले.

Web Title: Gram Panchayats should resolve issues of poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.