Sangli- ना हरकत दाखला देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी, नांद्रेतील ग्रामसेवक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:15 PM2023-09-21T16:15:06+5:302023-09-21T16:15:23+5:30
मिरज - नांद्रे (ता. मिरज) येथील ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे याने ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगलीतील लाचलुचपत ...
मिरज - नांद्रे (ता. मिरज) येथील ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे याने ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवाळे यास मिरजेतून अटक केली. ग्रामसेवक नवाळे याच्याकडे बुधगाव ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे.
अधिक माहिती अशी, बुधगाव येथील तक्रारदाराकडे त्याचे राहत्या घराचे मुल्यांकन करून खरेदी-विक्रीसाठी ना-हरकत दाखला देण्यासाठी नवाळे याने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारासोबत ३० हजार रुपयांवर नवाळे याने तडजोड केली. याबाबत तक्रारदार याने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रार अर्जानुसार विभागाने पडताळणी केली. पडताळणीत उमेश नवाळे, याने तक्रारदाराच्या राहत्या घराच्या मुल्यांकनासाठी खरेदी- विक्रीस ना हरकत दाखला देण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. उमेश याने लाच घेतली नसली तरी त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, हवालदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, रवींद्र धुमाळ, पोपट पाटील, सलीम मकानदार, धनंजय खाडे, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सुदर्शन पाटील, अनिस वंटमुरे यांनी ही कारवाई केली.