महाआघाडी सरकार जनतेच्या भावनेशी खेळते : सम्राट महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:00+5:302021-03-22T04:24:00+5:30
पेठनाका भाजपच्यावतीने सम्राट महाडिक नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जनतेचा कौल डावलून महाआघाडी सरकार ...
पेठनाका भाजपच्यावतीने सम्राट महाडिक नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जनतेचा कौल डावलून महाआघाडी सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे. सरकारला जनतेचे प्रश्न सोडवण्यात कोणतेही स्वारस्य नाही. तरी मुख्यमंत्री यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून ग्रहमंत्री अनिल देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी केली आहे. पेठनाका येथे शिराळा तालुका भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या नावाला देशात महाविकास आघाडीने बदनाम केले आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. याचा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. या विरोधातही हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सी. एच. पाटील, जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, वाळवा पश्चिम मंडळ अध्यक्ष सी. एच. पाटील, जिल्हा चिटणीस संजय घोरपडे, वाळवा तालुका सरचिटणीस डॉ. सचिन पाटील, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटसुते, वाळवा तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर, पेठचे उपसरपंच चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच अमिर ढगे, विश्वास पाटील, असिफ जकाते, अजित पाटील, अनिकेत सूर्यवंशी, अभिमन्यू कदम, अक्षय खिलारे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करू तसेच वीज बिलासंदर्भात लवकरच इस्लामपूर येथे आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही यावेळी महाडिक यांनी जाहीर केले.