सांगली ‘सिव्हिल’मध्ये दंत महाविद्यालय मंजूर-गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:26 PM2017-09-01T23:26:43+5:302017-09-01T23:29:29+5:30

 Grant of dental college in Sangli 'Civil' - Girish Mahajan | सांगली ‘सिव्हिल’मध्ये दंत महाविद्यालय मंजूर-गिरीश महाजन

सांगली ‘सिव्हिल’मध्ये दंत महाविद्यालय मंजूर-गिरीश महाजन

Next
ठळक मुद्देकर्करोग रुग्णांवर उपचारासाठी ५० कोटीआयुषच्या माध्यमातून ५० खाटांचे नवीन रूग्णालय सुरु केले जाईलपहिल्या टप्प्यात चार कोटी - दुसºया टप्प्यातील ११ कोटीचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) दंत महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगलीत शुक्रवारी केली. कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ५० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, तसेच रुग्णालयात आणखी ५० खाटांची क्षमता वाढविली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले.शासकीय रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन महाजन यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, मकरंद देशपांडे उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, राज्य शासनाने महाअवयवदान चळवळ हाती घेतली आहे. सध्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत १२ हजारहून अधिक नोंदणीकृत रूग्ण आहेत. यकृताच्या प्रतीक्षेतही पाच हजारहून अधिक नोंदणीकृत रूग्ण आहेत. त्यामुळे मेंदू मृत (ब्रेन डेड) रूग्णांच्या नातेवाईकांनी मेंदू मृत रूग्णांचे अवयव दान करण्याचा विचार करावा.

एका रूग्णाचे सात ते आठ अवयवांचे दान करता येते. त्या माध्यमातून तितक्याच लोकांना जीवनदान मिळते. अवयवदानासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यावे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच शासकीय रूग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी जनजागृती करण्याची विशेष मोहीम सुरू करावी.महाजन म्हणाले की, रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सांगलीच्या शासकीय रूग्णालयाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

प्रस्ताव पाच कोटीचा आला होता. आहेत, पहिल्या टप्प्यात चार कोटी दुसºया टप्प्यातील ११ कोटीचा निधी दिले लवकरच मंजूर केला जाईल. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शासकीय रूग्णालयाच्या आवारात कर्करोग रूग्णांना अद्ययावत सुविधांसाठी नवीन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५० कोटीचा निधी मंजूर केला आहे.वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उमेश भोईर यांनी सूत्रसंचालन केले.

विविध विभागांचे : उद्घाटन
जिआॅलॉजी विभाग, पाळणाघर, उपाहारगृह, महाराष्ट्र सुरक्षा बल, शुद्ध जल प्रकल्प, युरो सर्जरी विभाग, ज्येष्ठ नागरिक बाह्यरूग्ण, पोस्ट आॅपरेटिव्ह रिकव्हरी रूम, ह्युमन मिल्क बँक, योगा हॉल, अन्नछत्र, कर्करोग निदान, मेडिकल सोशल सर्व्हिस, नवीन सोनोग्राफी यंत्र, महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, सायरन यंत्रणा, एटीएम सुविधा, डायलेसिस सुविधा, लेडीज होस्टेलमध्ये शुद्ध जल प्रकल्प, जनरल विभाग, शरीररचना शास्त्र विभागात सभागृह, दिव्यांग प्रमाणपत्र, रेडिआॅलॉजी, एचएमआयएस प्रकल्प, रूग्णमित्र, फोटोथेरपी यंत्र, नवीन नेत्र बाह्यरूग्ण, पोलिस कक्ष, बालरूग्ण कक्ष, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग यांचे यावेळी महाजन यांच्याहस्ते संयुक्तरित्या उद्घाटन करण्यात आले.

महाजन यांच्याकडून घोषणांचा पाऊस
महाजन यांनी पहिल्यांदाच ‘सिव्हिल’ला भेट दिली. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी रुग्णालयातील सोयी-सुविधा व अडचणींबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी घोषणांचा पाऊसच पाडला. ते म्हणाले की, रुग्णालयातील अतिदक्षता विभाग रुग्णांवर उपचार करण्यास कमी पडू लागल्याचे चित्र आहे. यासाठी अतिदक्षता क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्तघटक संग्रहासाठी रक्तपेढी सुरू केली जाणार आहे. सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्यासाठी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. आयुषच्या माध्यमातून ५० खाटांचे नवीन रूग्णालय सुरु केले जाईल.

महिलांसाठी स्वच्छतागृह
खा. पाटील म्हणाले, सिव्हिलमध्ये दररोज अडीच हजाराहून अधिक रूग्ण तपासणीसाठी दाखल होतात. तासगाव तालुक्यात खासदार निधीतून डायलिसीस यंत्र व सांगली, मिरज शासकीय रूग्णालयात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देणार आहे.

Web Title:  Grant of dental college in Sangli 'Civil' - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.