द्राक्षदरप्रश्नी आज सुधार समितीचे आंदोलन : अमित शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:13+5:302021-03-10T04:28:13+5:30
सांगली : द्राक्ष मालाचे जाणीवपूर्वक दर पाडल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा कोणताही प्रयत्न केंद्र व राज्य शासनाने केलेला ...
सांगली : द्राक्ष मालाचे जाणीवपूर्वक दर पाडल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा कोणताही प्रयत्न केंद्र व राज्य शासनाने केलेला नाही. त्याचा निषेध म्हणून बुधवारी सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व मार्केट कमिटी येथे मोफत द्राक्षमणी वाटण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲड. अमित शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले की, कोरोना व लॉकडाऊनची अफवा पसरवून, तसेच मार्केटमधील उठाव नाही अशी अनेक खोटी कारणे तयार करून द्राक्ष व्यापाऱ्यांच्या साखळीने द्राक्षांचे दर कृत्रिमरीत्या पाडलेले आहेत. कमी दरात माल मागणे, बाग अर्धवट सोडून जाणे, संगनमत करून दर पाडणे, अशा प्रकारे शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे काम केले जात आहे. त्यावर राज्य व केंद्र सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही. शासनाने शेतकऱ्यांचा द्राक्ष माल विक्री व दर निश्चितीसाठी कार्यपद्धती तयार करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तजवीज करावी, या मागणीसाठी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शासकीय कार्यालयांमध्ये मोफत द्राक्ष मण्यांचे वाटप केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.