द्राक्ष व्यापाऱ्याकडून गंडा

By Admin | Published: March 26, 2017 10:38 PM2017-03-26T22:38:44+5:302017-03-26T22:38:44+5:30

जरंडीच्या बागायतदाराची लूट : पावणेदोन लाखाची फसवणूक

Grape Traders | द्राक्ष व्यापाऱ्याकडून गंडा

द्राक्ष व्यापाऱ्याकडून गंडा

googlenewsNext



तासगाव : जरंडी (ता. तासगाव) येथील द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची मध्यप्रदेश येथील द्राक्ष दलालाने फसवणूक केल्याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शेतकरी हणमंत शहाजी शिंदे (रा. जरंडी) यांनी फिर्याद दिली.
मेहफूज महंमद एफाज व त्याचा भाऊ मेहबूब महंमद एफाज (दोघेही रा. आबादी अमरवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांच्यासह त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरंडी येथील द्राक्षबागायतदार हणमंत शिंदे यांनी दलालांशी दि. १८ फेब्रुवारी रोजी द्राक्षबागेचा व्यवहार केला. सर्व द्राक्षे नेल्यानंतर एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचे येणे दलालाकडून होते. सुरुवातीला यातील १ लाख रुपये, तर नंतर दोन लाख रुपये असे दोन धनादेश एफाज याने दिले.
मात्र यानंतर तो व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळे हणमंत शिंदे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. (वार्ताहर)

Web Title: Grape Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.