स्वातंत्र्य चळवळीत सांगली जिल्ह्यातील स्त्रियांचे माेठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:52+5:302021-09-25T04:26:52+5:30
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ते बाेलत हाेते. पाटील म्हणाले, या जिल्ह्यातील क्रांतिवीरांगणांचा इतिहास माेठा आहे. ...
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ते बाेलत हाेते. पाटील म्हणाले, या जिल्ह्यातील क्रांतिवीरांगणांचा इतिहास माेठा आहे. सांगलीवाडीतील १९०६ च्या कृष्णाबाई कुलकर्णी यांच्या दारूबंदीसाठीच्या निदर्शनाने व चंपाबाई सुलतान, कळंत्रे आक्कांच्या खादी चळवळीने या भूमीतील स्त्रियांमध्ये क्रांतीचा अंगार फुलवला गेला. ३ सप्टेंबर १९४२ ला स्वातंत्र्याचे पहिले निशाण तासगाव कचेरीवर मोर्चाने लावले. आम्ही आमचे सरकार स्थापन करू शकतो, हे तासगावच्या लढ्याने सिद्ध केले. विजयाताई लाड, लक्ष्मीबाई नायकवडी, इंदुताई पाटणकर, हौसाबाई अहिर, रुक्मिणी विभुते, हौसाबाई पाटील यांनी भूमीगतांभोवती सुरक्षिततेचे कवच उभा केले.
प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत कृष्णा, वारणा खोऱ्यातील क्रांतिकारकांबरोबर स्त्रियांनी दिलेले योगदान आज प्रकाशात आणणे गरजेचे आहे. या भूमीतील स्त्रिया खूपच धाडसी होत्या.
प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. डी. वाय. साखरे यांनी प्रास्ताविक केले. लेप्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार यांनी आभार मानले. डॉ. कुलदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राध्यापक प्रबोधिनीचे सदस्य प्रा. प्रभाकर पाटील, डॉ. अमोल सोनवले, प्रा. आण्णासाहेब बागल, डॉ. अर्जुन वाघ यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य जे. ए. यादव, डॉ. एस. के. खाडे, नॅकच्या समन्वयक डॉ. अलका इनामदार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.